ॲड शुभम छाजेड सुवर्ण पदकाने सन्मानित. 

0
306

ॲड शुभम छाजेड सुवर्ण पदकाने सन्मानित. 

मास्टर ऑफ लॉ मध्ये मेरिट मध्ये उतिर्न, गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपालांद्वारे सन्मान.

राजू तुरणकर _संपादक 

वणी : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचा 11 वा आणि 12 वा दीक्षांत समारंभ 2 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन हे होते.

या समारंभात पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, प्रमाणपत्रे, पीएचडी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमात शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर येथील विद्यार्थी ऍड शुभम दीपक छाजेड यांनी ( L.L. M ) मास्टर ऑफ लॉ ( व्यवसाय कायदा ) या परीक्षे मध्ये वैशिठय पूर्ण मार्क्स घेऊन उच्च श्रेणी मध्ये आल्याबद्दल दिनांक 2/10/2024 रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे झालेल्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदक (गोल्ड मेडलिस्ट ) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ॲड शुभम दीपक छाजेड यांना यापूर्वी देखील सावित्रीबाई फुले विद्यापीठात LLB परीक्षेत गुणवत्ता श्रेणीत आल्याने रजक पदक देवून गौरविण्यात आले आहे.

ॲड शुभम हे वणी शहरातील प्रतिष्ठित व्यवसायिक व सामजिक कार्यकर्ते दीपक छाजेड यांचे चिरंजीव आहे.

या समारंभात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे डीन आणि विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here