मजरा येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या.

0
83

मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचे सत्र सुरूच , मजरा गावातील दुसरी आत्महत्या. स्वगृही केले विष प्राशन..

आनंद नक्षणे – मारेगाव.

मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मजरा येथील एका २८वर्षीय युवकाने स्वगृही तननाशक हे विषारी औषध प्राशन केल्याची घटना सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अमर याला प्राथमिक उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता अमर यांच्यावर प्राथमिक उपचार करून वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हालविण्यात आले होते. मात्र चंद्रपूर येथे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विष घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव अमर विजय किनाके वय 28 वर्ष, राहणार मजरा तालुका मारेगाव असे आहे. अमर यांच्या पश्चात आई वडील आणि एक विवाहित बहीण आहे… मागील आठवड्यात सुद्धा याच गावातील 8ऑक्टोबर रोजी एका युवकाने आत्महत्या केली होत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here