कोलगाव येथील शेतकऱ्याची कर्जापोटी आत्महत्या.

0
172

कोलगाव येथील शेतकऱ्याची कर्जापोटी आत्महत्या.

आनंद नक्षणे-  मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील शेतकऱ्याने लाखो रुपयाच्या कर्जापायी विष प्राशन करून जिवन यात्रा संपविल्याची घटना मंगळवारला रात्री 8 उघडकीस आली आहे.

विशाल अरविंद अवताडे वय 32 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तीन एकर शेती, दुसरे उदर निर्वाहाचे साधन नसल्याने व तटपुंज्या उत्पन्नामध्ये डोक्यावर वाढत असलेला कर्जाच्या डोंगर व त्यातून मानसिक तणाव वाढला व त्याच मानसिकतेतून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here