शेत मजुराने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या……
बोरी इचोड येथील खळबळजनक घटना..
आनंद नक्षणे- मारेगाव: तालुक्यातील रोज आत्महत्येचे सत्र सुरु असतांना आज पुन्हा गदाजी बोरी येथील एका शेत मजुराने आत्मघाती निर्णय घेत हिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना दि. १७ ऑक्टोंबर रोज गुरुवारला आज दुपारी उघडकीस आली.
प्रितम सुरेश सिडाम (32) असे आत्महत्या केलेल्या शेत मजूर पुत्राचे नाव आहे.प्रितम याने येथी विहिरीत रात्री उडी मारली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतआहे.आज दुपारी गावातील एक इसम विहीरी जवळ गेला असता विहिरीत मृतदेह तरगतांना दिसला.
प्रितम ने नेमकी कशामुळे आत्महत्या केली याचे कारण अस्पस्ट आहे.त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी व तीन मुले आहेत.परिणामी, तालुक्यात वाढत्या आत्महत्येचे सत्र कायम असून दररोज होणाऱ्या आत्महत्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. आत्महत्या हा चिंतनाचा विषय असल्याने गाव खेडे पातळीवर प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.