संजीव रेड्डी यांच्या उमेदवारीवर भाजपकडून शिक्कामोर्तब.
महविकास आघाडीच्या उमेदवारीवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता, वणीच्या उमेदवारीचा तिढा दिल्लीत….
राजू तुरणकर वणी : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवाराच्या नावांची पहिली यादी आज जाहिर केली आहे. पक्षाने वणी मतदार संघातून विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना परत तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी च्या वरिष्ठ नेत्यांची या दिल्ली मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभेच्या पहिली 99 जागांची यादी आज जाहीर झाली. या मध्ये वणी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे नाव जाहीर झाले आहे.
वणी विधानसभा मतदार संघांचे आमदार बोदकुरवार यांचे वर दरम्यान, विरोधकांनी षडयंत्र रचून विविध आरोप केले होते. त्यामुळे त्यांची जागा धोक्यात असल्याचे चर्चाजोर धरून होती. मात्र वणी मतदार संघात उल्लेखनीय कामगिरी असल्यामुळे त्यांची तिकीट कापणे अवघड होते, असेही म्हटलं जात होतं. त्यानंतर दिल्ली व मुंबई भाजपा च्या बैठकीत इतर उमेदवाराह आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनाच उमेदवारी देण्याचा एकमत ठरल्याच राजकीय वर्तुळातुन माहिती मिळाली होती. आज भारतीय जनता पार्टीची यादी जाहीर झाली, त्यामध्ये त्यांच्या उमेदवारीची केवळ 31 नंबर वर यादीत नाव ठेवत घोषणा केल्याने त्यांची पक्षातील पकडलक्षात येते. त्यामुळे ते विजयाबद्दल आस्वस्त असल्याचे व आता वणीला मंत्रीपदाचा मार्गही मोकळा असल्याचे निश्चित तिसऱ्यांदा त्यांना मिळालेल्या संधीने नागरिकांतून बोलल्या जात आहे. मात्र, या वणी विधानसभा करिता परत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला असून त्यांना परत विधानसभेत पाठवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहे.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची उत्कृष्ट कामगिरी व शांत स्वभाव यशाचे गमक….
विशेष उल्लेखनीय म्हणजे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी विधानसभा मतदार संघात भरघोस असा मोठया प्रमाणात निधी खेचून आणला आहे. दहावर्षात शहर ग्रामीण भागात बऱ्यापैकी कामे झालेली असून आदर्श आचारसंहिता लागायच्या अगोदर अनेक कामांचे लोकार्पण, भूमिपूजन व उदघाटन विधानसभेत केली व महत्वाचे प्रकल्प राहूनही गेली. पण राहून गेलेली काम पुन्हा जोमाने करण्यासाठी भाजपाने त्यांना परत विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी दिली. तसेच त्यांचा शांत स्वभाव व सर्व पक्षात त्यांचे असलेले हिताचींतक, लहान मोठ्या लोकांशी त्यांचा असलेला जन संपर्क त्यामुळे संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे वणी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फार मोठे राजकीय आवाहन ठरत आहेत.
वणी विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये प्रचंड तेढ निर्माण झाले आहे. वणी विधानसभेसाठी शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून प्रबळ दावेदारी निर्माण केल्यामुळे नेमकी जागा कोणाला सोडायची हा दोन्ही पक्षश्रेष्ठी समोर पेच निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षाचे विद्यमान उमेदवार हे प्रबळ दावेदार असून त्यांनी मागील अनेक दिवसापासून पक्ष वाढीसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनमानसांमध्ये आपली प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे या दोनही पक्षाच्या वतीने जागेवर हक्क सांगितल्या गेल्याने हा वाद आता मुंबईच्या राजकीय आखाड्यावरून थेट दिल्लीच्या दरबारी पोहोचला. त्यामुळे विकोपाला गेलेली वणीची दावेदारी आता महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी जनमानसात खमंग चर्चा आहे.