वणी विधानसभेकरिता महाविकास आघाडीचे संजय देरकर उमेदवार.

0
635

वणी विधानसभेकरिता महविकास आघाडीचे संजय देरकर उमेदवार …..

उबाठा शिवसेनेकडून संजय देरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब….

राजु तुरणकर – लोकवाणी जागर.

वणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी तर्फे हा मतदार संघ उबाठा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने, उमेदवारी कोणाला मिळणार हा प्रश्न सुटला असून संजय देरकर यांना पक्षाचे अधिकृत सचिव अनिल देसाई यांचे सहिनिशी प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव जाहीर करण्यात आले आहे.

वणी विधानसभेत शिवसैनिकांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विजयाचा गुलाल उधळण्याकरिता संजय देरकर तयार झाले आहे. नुकताच टीव्ही 9 या वृत्तवाहिनीवर 9 व्या क्रमांकावर पहिल्या यादीमध्ये नाव घोषित करण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता वणी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस वाढणार अशी चर्चा मतदार राजा करत आहे.

शांत स्वभावाचे, लहान मोठ्यांसोबत प्रेमाने बोलून सर्व शिवसैनिकांच्या मनात स्थान निर्माण केलेले, विद्यमान यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष,माजी नगराध्यक्ष, वणी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष, जगन्नाथ महाराज शाळा, कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष व नंदेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अशी बहुरंगी ओळख असलेले विधानसभेतील घरा घरात पोहचलेले व्यक्तिमत्त्व असून जनमानसात त्यांची चांगली पकड असून त्यांच्या या उमेदवारीने होणाऱ्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here