बोलेरो गाडीच्या धडकेत, दुचाकीस्वार ठार…

0
298

बोलेरो गाडीच्या धडकेत, दुचाकीस्वार ठार….

आनंद नक्षणे – मारेगाव.

शेतातून गावाकडे जाणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार तर सोबत असलेला इसम गंभीर जखमी झाल्याची घटना काल बुधवार ला रात्री 7.30 वाजता वणी मारेगाव करंजी राज्य महामार्गांवर घडली.

बुरांडा शिवारात असलेल्या शेतातून कामे आटपून दोघेजण दुचाकीने राज्य महामार्गाने खडकी गावाकडे निघाले. अशातच वणी वरून भरधाव येणाऱ्या बोलेरो वाहनाने खडकी फाट्जवळील दुचाकीला जबर धडक दिली. यात खडकी (बु.) येथील हरी दिगांबार अवताडे (45) हे जागीच ठार झाले,  तर दुचाकीवर सोबतीला असलेला अतुल झिंगू उईके वय वर्ष (27) हे गंभीर जखमी झाले. या अपघातात अतुल यांचा पाय तुटल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here