गौराळा – वरूड टेकडीवर आज गायगोधन (गोपूजा) सोहळा २०२४ होणार संपन्न….

0
510

गौराळा – वरूड टेकडीवर आज गायगोधन (गोपूजा) सोहळा २०२४ होणार संपन्न….

दिवाळीच्या मंगलमय पर्वातील नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी…

राजु तुरणकर —

राज्यात बलिप्रतिपदा ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केली गेली. त्यानिमित्ताने राज्यभरातील गोधन पाळणारे बांधव आणि नागरिकांनी त्यांच्या गोधनाची पूजा केली जाते , त्यांच्या मिरवणुका काढल्या जातात राज्यातील विविध भागात विविध प्रथा पाळल्या जात आहेत.

अनेक वर्षांची परंपरा असलेला वणी शहरापासून केवळ 10 किलोमिटर तर मारेगाव पासून 5 किलोमिटर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील गौराळा-वरुड मार्गावरील टेकडीवरील माडावर (मोठा देव मंदिर) बलीप्रतिपदेच्या दिवशी शनीवार दि. २ नोव्हेंबर २०२४ ला (दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत) गायगोधनाचा सामुहिक सोहळा संपन्न होईल.

या गायगोधन सोहळ्यासाठी चिंचाळा, गौराळा, वरुड, आकापूर, नेत, पिसगाव, पाथरी इ. गावचे गुराखी / शेतकरी आपआपल्या गावातील सजवलेल्या गायींना या ठिकाणी पुजेसाठी आणतील. मोठा देवाची पूजा व सजवलेल्या गायींची मंदिराला प्रदक्षिणा होईल. या प्रसंगी गुराखी व त्यांचे सहकारी वादन, गायन (गायगोधनाची गाणी आरती) व नृत्य करतील.

हा सोहळा शिस्तबध्द शांततामय रितीने पार पडावा या उद्देशाने गणेश किंद्रे साहेब (उपविभागीय पोलिस अधिकारी, वणी) व शंकर हटकर साहेब (वनपरिक्षेत्र अधिकारी, मारेगाव) निरीक्षणासाठी उत्सव स्थळी भेट देणार आहे.

या सोहळ्यासाठी जास्तित जास्त नागरीकांनी उपस्थितीत रहावे, असे उत्सव समिती तर्फे नम्र आवाहन.प्रा. सुरेंद्र गोविंद नावडे) गायगोधन उत्सव समिती सदस्य यांनी केले आहे.
मो. ९४०४३६३४९५ / ९८२३२८५५९८

यापुर्वीच्या गायगोधन सोहळ्याची काही संग्रहीत चित्रे..छायाचित्रकार प्रा. सुरेंद्र गोविंद नावडे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here