निष्ठावंत कार्यकर्ते विजय खेचून आणतील – वामनराव कासावार.

0
386

संजय देरकर यांच्या प्रचाराचा झंजावात, शिवसेना, काँग्रेस, कोम्रेड, राष्ट्रवादी व आरपिआय गटाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केला विजयाचा निर्धार…

निष्ठावंत कार्यकर्ते हे विजय खेचून आणतील हा माझा आतमविश्वास – वामनराव कासावार.

लोकवाणी जागर वृत्तांक…

महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु झाला आहे.

शिवसैनीकांकडून संजय देरकर यांचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. मशाल हे चिन्ह गावागावात पोहचविण्याचं काम शिवसैनिक करीत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेही संजय देरकर यांच्या प्रचारात उतरले आहेत. संजय देरकर यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. वणी व मारेगाव नंतर झरी जामणी तालुक्यातही संजय देरकर यांच्या प्रचार कार्यालयांचे थाटात उदघाटन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, कॉमेड चे ऍड दिलीप परचाके व काँग्रेसची जेष्ठ नेते मंडळी तसेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

६ नोव्हेंबरला खडकी येथील फार्म हाऊसवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. त्यानंतर मुकुटबन येथील राजेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर झरी तालुक्यात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
दुपारी १२ वाजता मुकुटबन येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर खडकडोह येथील गणेश मंदिरात पूजाअर्चा करण्यात आली. सोबतच झमकोला शिवगड, शिबला चौफुली व माथार्जुन पाटण मार्गावरील देवीच्या मंदिरात पूजा केल्यानंतर संजय देरकर यांचा ताफा झरी येथे पोहचला. दुपारी ३ वाजता झरी येथील प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. पश्च्यात झरी जामणी येथील महाकाली मंदिरात पूजा करून झरी प्रचार शुभारंभ दौऱ्याचा समारोप करण्यात आला.

झरी प्रचार शुभारंभ दौऱ्यात माजी आमदार वामनराव कासावार यांच्यासह काँग्रेसचे नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी कडून संजय देरकर यांचा झंझावाती प्रचार करण्यात येत आहे. शिवसेना व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते गावागावात जाऊन संजय देरकर यांचा सकारात्मक प्रचार करीत आहेत. वणी विधानसभा क्षेत्रात मशाल पेटवायचीच हे उद्दिष्ट ठेऊन महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. संजय देरकर यांच्या प्रचार दौऱ्यांना जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

निष्ठावंत कार्यकर्ते विजय खेचून आणतील – वामनराव कासावार माजी आमदार..

महाविकास आघाडीत घटक असलेल्या सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते हे जोमाने प्रचाराला भिडले आहेत. आम्ही गावागावात जाऊन जनतेशी संपर्क साधून त्यांच्या मनातली गोष्टी जाणून घेत आहो, गावो गावी जनता स्वयंस्प्रूर्तीने महाविकास आघडीचे उमेदवार संजय देरकर यांचे समर्थन करीत आमचे स्वागत करित आहे. जनतेच्या मनातील महायुती सरकारच्या प्रती तीव्र नाराजी आहे. आमच्या पक्षातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते व शिवसैनिक जिवाच रान करून हा विजय खेचून आणतील असा मला आत्मविश्वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here