संजय खाडे यांच्या प्रचारार्थ शिरपूर येथे पदयात्रा….
शिट्टी वाजवत प्रचाराची रणधुमाळी…
लोकवाणी जागर:– शिरपूर येथील कैलास शिखर देवस्थानाला भेट देऊन प्रचाराची सुरूवात झाली. शिरपूर येथे भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी शिरपूर व परिसरातील हजारो नागरिकांनी या पदयात्रेत सहभाग घेतला. लोकांनी शिट्टी वाजवून अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
अपक्ष उमेदवार असलेले संजय खाडे यांना जनतेतून मिळत असलेला भरगोस पाठिंबा बघता त्यांच्या प्रचारामध्ये प्रचंड ताकद निर्माण झाली असून, एकंदरीत निवडणुकीचे वातावरण व प्रचाराची चुरस बघता निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे.