शेतकऱ्यांचे कैवारी उध्दव ठाकरे यांची आजची सभा ऐतिहासिक ठरणार.

0
244

शेतकऱ्यांचे कैवारी उध्दव ठाकरे यांची आजची सभा ऐतिहासिक ठरणार. 

महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, जनप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना सभेला उपस्थित राहण्याचे संजय देरकर , काँग्रेसचे वामनराव कासावार, कोम्रेड दिलिप परचाके व राष्ट्रवादीचे विजय नगराळे यांचे आवाहन.

वणी विधानसभा क्षेत्रातील निष्ठावंत शिवसैनिक  मशाल घेवून पेटुन उठल्याचे चित्र, प्रचारात आघाडी…

लोकवाणी जागर वृत्त 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे कैवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची उद्या महाविकास आघाडीचे (ऊबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ भव्य अश्या ऐतहासिक सभेचे वणी येथिल पाण्याच्या टाकी जवळील शासकिय मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या मालांचे पडलेले भाव, परिसरातील प्रतिष्ठ समाजाबद्दल बोललेले ते शब्द यावरून शेतकरी शेतमजुर व स्वाभिमानी समाजबांधवांच्या मनात असंतोष निर्माण झाली आहे.

हा असंतोष व्यक्त करताना सर्व सामान्य जनता दिसून येत आहे,ती खदखद मतदार मतदान करतांना कोण्याच्या बाजून जाईल या वरून निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे…

उद्धव साहेब काय बोलणार याकडे वणीकर जनतेचे लक्ष…

आज होणाऱ्या सभेत उद्धव ठाकरे पक्षांतर्गत घडामोडी, शेतकऱ्यांचा असंतोष, वणी परिसरातील वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व समाजाबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य यावरून तापलेले राजकारण यावर काय वक्तव्य करतील याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे..

महाविकास आघडीच्या घटक पक्षातील काँग्रेस , राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना या सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी, जनप्रतिनिधी यांना सभेला ठरलेल्या वेळेतच उपस्थित राहण्याचे आवाहन संजय देरकर व काँग्रेस चे माजी आमदार वामनराव कासावार , दिलिप परचाके व विजय नगराळे यांनी केले आहे.

शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून जो निष्ठावंत शिवसैनिक आहे. तो पक्षांतर्गत झालेल्या घडामोडी मुळे पेटुन उठला असुन, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबुत करण्यासाठी जिवाच रान करून प्रचारात सहभागी होतांना दिसून येते आहे, तर आज सभेच्या ठिकाणी सर्व निष्ठावंत शिवसैनिक एकत्र पहावयास मिळणार असल्याने सर्व शिवसैनिकामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here