चला परिवर्तनासाठी एकत्र चालुया, वणी शहरात युवा सेनेचा प्रचाराचा झंजावात.

0
318

चला परिवर्तनासाठी एकत्र चालुया, वणी शहरात युवा सेनेचा प्रचाराचा झंजावात.

संजय देरकर यांचे पदयात्रेत सहभागी होण्याचे अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हाप्रमुख यांचे आवाहन…

लोकवाणी जागर.. वणी  शहरामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय दरेकर यांच्या प्रचारार्थ (१७ नोव्हेंबर २०२४  दुपारी १ ते 5 वाजे पर्यंत )  भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली असुन , महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्षातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस (sp) शिवसेना (ऊबाठा), समाजवादी, माकप, आप च्या नेत्यांनी सर्व जनतेला, कार्यकर्त्यांना व सुज्ञ मतदारांना या प्रचार पदयात्रेमध्ये समाविष्ट होऊन संजय देरकर यांना विजयी करण्याचे आवाहन युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केले आहे.

वणी विधानसभा क्षेत्राच्या होवु घातलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांना विजयी करण्यासाठी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात अजिंक्य शेंडे, उमेश पोद्दार सह युवा सेनेचे दिपक पिदुरकर, रोशन जाधव, अमन बरशेटीवार, तनवीर खान, नेहा जाधव, मंगला वैद्य, शशिकला पिंपलकर, जोती वानखेड़े या कार्यकर्त्यांनी व महिलांनी हा परिसर पिंजून काढून उद्याच्या  पदयात्रेत कार्यकर्त्यांनी व सर्वांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील होऊन परिवर्तनाचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here