कलाकार महासंघाचा संजय देरकर यांना पाठिंबा…

0
271

कलाकार महासंघाचा संजय देरकर यांना पाठिंबा…

भजन मंडळींचा प्रचारात सहभागी होवून निवडूण आणण्याचा निर्धार…

लोकवाणी जागर…

कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने होणाऱ्या निवडणुकीत संजय देरकर यांना पाठिंबा देण्यात आला.
संघटना गेली १८ ते १९ वर्षे पासून कलाकारांच्या न्याय मागण्या साठी मोर्चे आंदोलने रास्ता रोको निवेदने देऊन शासन दरबारी कलाकारांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम संघटनेने प्रामाणीकपणे केलेले आहे. राष्ट्रामध्ये संघटनेचे काम २१ जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. परंतू भविष्यात हे काम पण एकट्याने करून चालणार नाही तर आपणा सोबत राज्य सरकार मध्ये कोणीतरी हक्काचा प्रतिनिधी असने गरजेचे आहे, म्हणून वणी विधान सभा मतदार संघातील सर्व भजन मंडळींनी संजयभाऊ देरकर यांना जाहिर पाठींबा देवून त्यांना निवडून आणण्यासाठी कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना करीत असल्याचे पूनवट येथील रामदास पखाले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here