सकल कुणबी समाजाचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा..

0
2619

सकल कुणबी समाजाचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा..

संजय देरकर यांना मतदान करण्याचे आवाहन..

राजु तुरणकर वणी :- येथील जिल्हा परिषद कॉलनीतील हनुमान मंदिराचे सभागृहात आज ता. १७ रोजी सायंकाळी ७ वाजता झालेल्या सकल कुणबी समाजाच्या बैठकित तीन मुद्यावर सर्वांनी विचारविनिमय करून चर्चेअंती एकमताने महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला आहे.

वणी विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संजय निळकंठ देरकर हे निवडणूक लढवीत आहे. ह्या मतदार संघातील वणी, मारेगाव, झरी तालुक्यात शेतकऱ्याची संख्या लक्षणीय असून बहुसंख्य शेतकरी हे सर्व शाखेतील कुणबी समाजाचे आहे. आज रोजी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी डबघाईस आला आहे. शेतीचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, कोळसा खाण प्रकल्प ग्रस्तांचे गंभीर प्रश्न आ वासून उभे आहे.

ह्या सर्व प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन करणे अनिवार्य आहे. असा झंझावात संपूर्ण मतदार संघात निर्माण झाला आहे. करिता सकल कुणबी समाजाने संयुक्तरित्या बैठकीचे आयोजन करून पुढील मुद्यांवर चर्चा केली. यातील मुद्दा क्रमांक १. अपक्ष उमेदवार नामांकन मागे घेण्यासाठी समाज बांधवांनी नामांकन मागे घेण्याची विनंती केली असता त्यांनी ती धुडकावून लावली व आपली उमेदवारी कायम ठेवली. मुद्दा क्रमांक २. कोणत्याही उमेदवाराला पक्षाच्या बांधिलकी शिवाय निवडून येणे अशक्य आहे व पक्षा शिवाय सरकार कडून विकासाकरिता पर्याप्त निधी उपलब्ध होऊ शकत नाही. मुद्दा क्रमांक ३. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याने सकल कुणबी समाजाबद्दल आमदार समक्ष अभद्र टीपणी करून समाजाच्या भावना दुखावल्यामुळे कुणबी समाज हा भाजपा पासून दुरावला आहे. म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना सकल कुणबी समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा घोषित करून निवडून आणन्याकरिता आवाहन केले आहे. यावेळी बैठकीचे अध्यक्ष म्हणून माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे, तर प्रमुख उपस्थित ऍड. पुरुषोत्तम सातपुते, वणी येथील कुणबी समाजाचे अध्यक्ष मंगेश रासेकर, ज्येष्ठ समाज बांधव जयसिंग पाटील गोहोकर, मोरेश्वर वासेकर, एन. डी. सोमलकर, जगदीश ढोके, भद्रावती येथील कुणबी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग टोंगे, मुकुटबन सुनील ढाले, ऍड. घनश्याम निखाडे, शैलेश ढोके, गुलाब आवरी, इंजी. कुंडलिक ठावरी,अंबादास वाघदरकर,प्रा. अनिल डहाके, पंकज पिदूरकर, राहुल खारकर, रवींद्र गौरकार, आनंद घोटेकर, नंदकुमार भोंगळे, संजय आ, प्रकाश पाकमोडे, भाउराव पाचभाई, गजानन जीवतोडे, जी. के. टोंगे, अभय साहेब पानघाटे, सुरेश राजूरकर आदी समाज बांधव उपस्थित होते. या सभेचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन रुद्रा पाटील कुचनकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here