प्रणय मूने या युवकावर त्याच्या राहत्या घरात घुसुन प्राणघातक हल्ला…

0
1724

प्रणय मूने या युवकावर त्याच्या राहत्या घरात घुसुन प्राणघातक हल्ला…

आरोपी हिंगणघाट येथील गुंड प्रवृत्तीचा….

राजु तुरणकर – संपादक.

प्रणय मुकुंद मुने (अंदाजे वय २३ रा. माळीपुरा) असे हल्ल्यात गंभीर जखमीचे नाव आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने घरात घुसून त्याच्या गळ्यावर जीवघेणा वार करून सशस्त्र हल्ला केला. प्रणयला उपचारासाठी प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे रवाना केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी करून जखमीला नागपूर ला पाठवले आहे. हल्लेखोर हे हिंगणघाट वर्धा जिल्हा येथील असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

वणी शहारातील मध्यवस्तीत आसलेल्या माळीपुऱ्यातील घाडगे वाड्याजवळील प्रणय मुने यांचे घर आहे, तो त्यांच्या आईसमवेत राहत असतो..

सकाळी दोन युवक घरी आले व त्यांच्यात आपसात वाद उफाळुन आल्याचे दिसले व त्याच्या छातीवर बसून त्याचा गळा चिरून प्रणय ला मारण्याचा प्रयत्न सुरु असताना त्याच्या आईच्या लक्ष्यात येताच आरडा ओरड झाल्यानंतर शेजारील मुले जमा झाली व आरोपींना पकडुन पोलिसांना माहीती दिली असता तात्काळ पोलीस अधिकारी येवून आरोपींना पकडुन नेले व प्रणयवर ग्रामीण रुग्णालय वणी तेथे उपचार करुण त्याला पुढील उपचारासाठी नागपूर रेफर करण्यात आले. प्रणयची श्वास नलिका कापल्यागेल्यामुळे  त्याची तबीयत अत्यंत सिरीयस असून त्याच्यावरती नागपूर  येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात तातडीचे उपचार सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here