कापूस विक्री प्रकरणावरून शिवसेना आक्रमक, सीसीआय ला धोरण सुधारण्याची गरज..

0
306

बाजार समिती व सीसीआयच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासामुळे शिवसेना आक्रमक….

सीसीआय विरोधात शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष, शिवसेनेचा गंभिर आरोप…

जिल्हा सहायक निबंधकाला आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात शिवसेना उपजिल्हप्रमुख संजय निखाडे यांचे निवेदन…

राजु तुरणकर…

आमदार संजय देरकर यांनी सीसीआय व बाजार समितीच्या प्रशासना सोबत दिनांक २६ नोव्हेंबरला बैठक घेत परिसरातील शेतकऱ्यांना कापूस खरेदीबाबत कोणताही त्रास होणार नाही असे सुचवले होते. त्यानंतरही बाजार समिती प्रशासन व सीसीआयचे अधिकारी आडमुठे धोरण अवलंबिले असल्याने शेतकरी त्रस्त असल्याचे दिसुन येत असल्याने शिवसेना कापूस विक्री प्रकरणावरून आक्रमक्र होत सीसीआय विरोधात निवेदन देवून धोरणात आमूलाग्र बदल करण्या संदर्भात अवगत केले आहे.

शेतकऱ्यांची नोंदणी योग्य पध्दतीने होत नसल्याने दिवसभर शेतकऱ्यांना ताटकळत बाजार समितीच्या यार्डातच थांबावे लागत आहे. तर अनेकदा शेतकऱ्यांना परत पाठविण्यात येत आहे. यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांनाच सहन करावा लागत असल्याने शेतकरी त्रस्त असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सीसीआय व बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातुन होत असलेल्या या प्रकारामुळे शेतकरी वर्गात कमालीचा असंतोष असून सुद्धा,  बाजार समितीचे संचालक मंडळ व सीसीआय चे कर्मचारी शेतकऱ्यांची नोंदणी योग्य पद्धतीने करत नाही. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. नियमानुसार योग्य पद्धतीने नोंदणी करणे गरजेचे असताना तांत्रिक कारण देत शेतकऱ्याऱ्यांना नाहक त्रास होत असल्याने आ. संजय देरकर यांनी तात्काळ संचालक मंडळ व सीसीआयच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून योग्य सूचना केल्या होत्या, मात्र अधिकारी व संचालक आपलीच मनमानी करत असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांची होत असलेली कुचंबना व आर्थिक परवड यामुळे त्यांच्यात चांगलाच रोष निर्माण झाला आहे. भविष्यात २००४ मध्ये झालेल्या दुर्देवी घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची गंभिर बाब  सुद्धा बाजार समितीच्या निवेदनातून लक्षात आणून देण्यात आली आहे. आणि तसा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वोतोपरी बाजार समितीचे संचालक सीसीआय चे अधिकारी प्रामुख्याने जबाबदार धरले जाईल. तरी आपल्या स्थरावरून शेतकऱ्यांना  कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेत,  कार्यपद्धती सुधारण्याच्या सूचना बाजार समितीला व सीसीआय ला देण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी केली यावेळी सुधीर थेरे, रविभाऊ पोटे, प्रविण खानझोडे, मंगेश पाचभाई, राजेंद्र ईद्दे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here