मारेगाव येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन.
गरजवंतांना 11 शिलाई मशीनचे वाटप..
लोकवाणी जागर वृतांक
अनंत श्री विभूषित जगद्गुरुश्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा व प्रवचन सोहळ्याचे आयोजन यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहर येथे दिनांक 8 डिसेंबर 2024 रोज रविवार सकाळी 9 : 00 वाजता करण्यात आले आहे. हा सोहळा मारेगाव शहरातील संत जगन्नाथ महाराज मार्केट यार्ड, कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव शहर येथे करण्यात आला, असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ शेगावचे पीठ प्रमुख कुंडलिक वायभासे,पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे साहेब, जिल्हा निरीक्षक भानुदास जाधव, जिल्हाध्यक्ष कैलास डोंगरकर, मारेगाव तालुकाध्यक्ष सुभाष मते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश साबळे यांनी दिली.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान तर्फे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये मरणोत्तर देहदान, रक्तदान शिबिर , आदिवासी पाड्यातील गरीब मुलांसाठी मोफत ड्रायव्हिंग स्कूल, गोरगरिबांच्या मुलासाठी नाणीज येथे इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, मोफत रुग्णालय,राज्यातील पाच हायवे वरती 24 तास विनामूल्य 53 रुग्णवाहिका अपघात ग्रस्त रुग्णांच्या सेवेत अविरतपणे चालू आहे.
यानिमित्ताने शहरातून जगद्गुरुश्रीच्या पादुकांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. जगद्गुरुश्रींच्या पादुकांचे सभा मंडपामध्ये आगमन झाल्यानंतर विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत .त्यामध्ये गुरुपूजन, उपासक दीक्षा ,आरती सोहळा , जगद्गुरुश्रींचे पादुका आगमन,अमृततुल्य असे प्रवचन , दर्शन सोहळा ,पुष्पवृष्टी तसेच मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते सामाजिक उपक्रमा अंतर्गत समाजातील गरजवंतांना 11 शिलाई मशीनचे मोफत वाटप आदी भरगच्च कार्यक्रम दिवसभरामध्ये संपन्न होणार आहेत. यावेळी उपासक दिक्षाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त भक्तगण यांची बुकिंग करून घ्यावी. उपस्थित भक्तगणांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिष्य, साधक, उपासक,भक्तगण , हितचिंतक,कार्यकर्ते यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या नयनरम्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पीठ प्रमुख,पीठ सहप्रमुख,पिठ व्यवस्थापक ,जिल्हा निरीक्षक, पीठ समिती सदस्य ,जिल्हाध्यक्ष,हिंदू संग्राम सेना, महीला सेना, युवा सेना,ज.न.म.प्रवचनकार,गुरुसेवक, सर्व आजी व माजी पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष,जिल्हा समिती, तालुका समिती, सेवा केंद्र समिती,आरती केंद्र समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.