“सेल्फी विथ माय फॅमिली” उपक्रम राबवून नगर परिषद शाळेने केले मतदान जागृती अभियान

0
104

सेल्फी विथ माय फॅमिली” उपक्रम राबवून नगर परिषद शाळेने केले मतदान जागृती अभियान. 

महापरिनिर्वाण दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून विद्यार्थ्यांना केले बक्षीस वितरण.

राजु तुरणकर – संपादक.

महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 8 वणी येथे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. सोबतच महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने शाळेतर्फे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पालकांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांकडून ” सेल्फी विथ माय फॅमिली “ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत भाग घेतलेल्या सर्व पालकांना या कार्यक्रमानिमित्त लकी ड्रॉ काढून बक्षीस देण्यात आले.

विशेष म्हणजे विद्यार्थ्याद्वारा राबविलेल्या उपक्रमामुळे वणी शहरातील मतदान केंद्र क्र.143 बुथवर 80.79% मतदान झाले.वणी शहरातून सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे मतदान झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार खिरेकर हे होते तर बक्षीस वितरक म्हणून वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशासन अधिकारी नितेश राठोड, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष मनीषा शिवरकर व आयोजक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार हे होते. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थिनी क ईशा मानकर , चतुरी डांगे व आरोशी पुरी या विद्यार्थिनींनी बाबासाहेबांबद्दल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात गजराज परोथी ,स्वरा गुरूनुले व डिंपल गुरनुले या विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागत गीताने झाली.

याप्रसंगी लकी ड्रॉ मध्ये सतीश गुरनुले यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर लक्ष्मण डांगे यांना द्वितीय व विनोद कळस्कर यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. प्रमुख अतिथी गिरीधर चवरे व बक्षीस वितरक सचिन गाडे साहेब यांनी शाळेने राबविलेल्या उपक्रमाबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सोबतच कार्यक्रमाचे अध्यक्ष खिरेकर यांनी मतदानासाठी राबविलेल्या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शाळेचे पालक या सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक देवेंद्र खरवडे तर आभार प्रदर्शन अविनाश तुंबडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका सुनिता जकाते ,किरण जगताप, निलिमा राऊत, छाया मांढरे, मदतनीस निशा कावडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here