बोगस कर्मचारी तहसिल कार्यालयातील कारभार सांभाळत असल्याचा युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांचा गंभिर आरोप.
माजी आमदारांच्या कारवाई नंतर सुद्धा तहसिल प्रशासन निद्रेत…
राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
राकेश लक्षेट्टीवार हा व्यक्ती मागील अनेक वर्षापासून तहसिल कार्यालयात शासकिय कर्मचारी नसताना, तहसिल कार्यालय वणी येथील शासकिय कामे सांभाळत असल्याचा आरोप युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देवून केला आहे.
अन्न पुरवठा विभागातील महत्वाची कामे जशे कि दुकानदाराची धान्य मंजूर करून देणे व दुकानदाराची पुर्ण रेकॉर्ड आपल्या जवळ ठेवणे व ऑनलाईन चे कामे, नावे कमी, जास्त करणे , नविन राशन कार्ड तयार करणे व प्राधान्य अंत्योदय कार्ड तयार करून शासकीय नियमानुसार लाभार्थीचे अर्ज घेऊन प्राधिकारी अधिकाऱ्याचे मंजूर करून घ्यावयाचे असताना दलाली मार्फत मोजकेच कागद पत्र बोलाऊन किंवा व्हाट्सअप द्वारे बोलावून हार्दिक व्यवहार करून बोगस कामे मोठ्या प्रमाणात केले असल्याचा गंभीर बाब निवेदनात नमूद केले आहे.
लोकांना पुरवठा विभागाचे कोणतेही काम राहिल्यास राकेश लक्षेट्टीवार हा विभागाचा साहेब मिच आहे असा स्वतः तो सर्वांना सांगून, मी म्हणेल तेच योग्य अशी अवस्था या विभागाची झाल्याने याला तहसीलदार सुद्धा भितो की काय अशी जनतेत चर्चा आहे. आम्ही तहसीलदारांकडे प्राधान्य गट समाविष्ट करण्याबाबत नविन राशन कार्ड बदल दिलेल्या अर्जावर निकाल द्या म्हटल्यावर तहसीलदार सांगतो की राकेश ला भेटा हा निरीक्षण अधिकारी आहे की नायब तहसीलदार आहे हेच कळत नाही कारण पुरवठा विभागातील राकेश कडे गेले असतां प्राधान्य गट व अंत्योदय कार्ड टाकण्याकरिता लाभार्थ्यांकडून सुमारे 3000 ते 5000 रुपये घेतले जाते हे काम राकेश लक्षेट्टीवार करतो. व अपंग विधवा अत्यंत गरीब गरजू लोकांचे अर्ज दिले आहे परंतु लोकांना त्याचा लाभ मिळाला नाही व त्याचे काम सुद्धा झाले नाही परंतु जे लोक पुरवठा विभागाच्या ऑफिसमध्ये जातात त्या लोकांना राकेश लक्षेट्टीवार हा वेक्ती प्रति कार्ड 500 रुपये घेतल्याशिवाय गरीब लोकांचे रेशन कार्ड चे काम करून देत नसल्याची तक्रार माजी आमदार साहेब यांना पुरवठा विभागातील भ्रष्टाचार माहित होताच त्यांनी अन्न पुरवठा विभागात येऊन काही दिवसांपूर्वी राकेश लक्षेट्टीवार सह त्याची पूर्ण टीम पुरवठा विभागातून ताबडतोब काढून टाकण्यात आले होते व दोन महिने पुरवठा विभागातील काम कुठलेही प्रकारचा भ्रष्टाचार न करता सुरळीत पणे सुरू होते तरी सुद्धा वरिष्ठ अधिकारी व बोगस कामे करून घेणारे काही दुकानदार यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी वणीतील वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलुन राकेश लक्षेट्टीवार त्याला पुरवठा विभागात अजुन त्याच कामावर रुजू करण्यात आले.
पुरवठा विभागाचे सरकारी कर्मचारी हे काम करीत नसून , राकेश लक्षट्टीवार हा त्यांच्या ऑफिसचे संपूर्ण कामे करतो, तसे की दप्तर टेबल माहिती पाठविणे रेकॉर्ड ठेवणे ई-मेल हाताळणे विभागातील संपूर्ण कर्मचाऱ्यांना आता खाली ठेवून हा आपले रवीपणा गाजवतो व विभागाच्या संपूर्ण चाब्या कर्मचाऱ्याकडे नसून राकेश लक्षेट्टीवार हाच स्वतः जवळ ठेवतो, व ऑफिस टाईमच्या व्यतिरिक्त हा आपले बोगस कामे करील राहतो, म्हणून पुरवठा विभागा हा बे टाईम चालू राहत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.. गेल्या काही वर्षापासून राकेश लक्षेट्टीवार यांनी खूप बोगस कामे करून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केलेली आहे दुकानदारचे बोगस काम करून देतो व ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतो तरीसुद्धा या व्यक्ती वर कारवाई करून, जनतेची कामे सोपी व सोयीस्कर करावी, व होत असलेला भ्रष्टाचार थांबवा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी धनराज येसेकर, संजोग झाडे, अंकुश येसेकर,अमोल आरेल्लवार, सुरेश शेंडे, अनिल ढगे, मंगल भोंगळे, सूजल जुमरे, गणेश आरेल्लवार, बबलू मेश्राम उपस्थित होते.