श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस वणीत अभिवादन कार्यक्रम संपन्न.

0
712

श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस वणीत अभिवादन कार्यक्रम संपन्न.

गरजवंतांना ब्लॅंकेट , महाप्रसाद वाटप व वृक्षारोपण करून अभिवादन..

आजही समाजाला गाडगे बाबांच्या विचारांची गरज – किरनताई देरकर 

राजु तुरणकर – संपादक.

निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा चौक वणी येथे स्मृती दिनाच्या निमित्ताने किरण ताई संजय देरकर यांच्या प्रमूख उपस्तीतित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन व हारार्पण कार्यक्रम सकाळी 10 वाजता संपन्न झाला.

सर्वप्रथम श्री संत गाडगे बाबांच्या स्मारकाला किरनताई संजय देरकर, विजय चोरडिया, दिपक कोकास,सुनील कातकडे, संभाजी वाघमारे, दिलीप मस्के, शेखर चिंचोलकर, यांचे हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

गरजूंना ब्ल्यंकेट तर महाप्रसादाचे वितरण.

संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिननिमित्त गरजवंताला ब्ल्यांकेट वाटप नगर सेवा समितीच्या वतीने विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनात तर महाप्रसादाचे वितरण  संभाजी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.

गाडगे बाबांच्या कार्याची उजळणी.

गुरुदेव सेवा मंडळाचे ठेंगणे, विजयाताई दहेकर, विजय चोरडिया, किरण ताई देरकर, सुनील कातकडे व दिलीप मस्के यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याची महती सांगितली.

समाजाला गाडगे बाबांच्या स्वच्छ्ता, शिक्षण व निर्व्यसनी जिवन जगण्याच्या विचारांची आजही गरज असल्याचे प्रतिपादन किरन ताई देरकर यांनी केले.

यावेळी गीताताई उपरे, नंदा गुहे, चंदा मुन, वैशाली देठे, मीनाक्षी मोहिते, पुष्पाताई भोगेकर, सुरेखा आवरी, कलावती क्षिरसागर, भावना मुके,बेबी ताई थेटे, प्रतिभा फाले, गीता तुरणकर, संगीता दोडके,रिंकू महाकुलकर, रुपाली महाकुलकर, साधना तुरणकर , माधुरी फाले , राजु तुरणकर, प्रवीण खानझोडे, रवी बोडेकर, गुलाब आवारी, संजय देठे , भगवान मोहिते, डॉ जगन जुनगरी, दिलीप भोयर, विनोद ढुमणे, दिलीप कोरपेनवार,राजु धवांजेवार, प्रदीप मुके, मंगेश भोस्कर, उमाकांत भोजेकर, नितीन बिहारी, स्वप्नील बिहारी, महादेव दोडके, संदिप फाले, गजनान पिंपलकर, अरविंद क्षीरसागर, राजेश महाकुलकर, दिलीप नांदे, भास्कर पत्रकार , नरेंद्र क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, गणेश दूरकर सुमित तुरानकर, संजय तुराणकर,  पुरुषोत्तम थाटे, सुनील चिंचोळकर, पवन महाकुलकर, सतीश दोडके, दिवाकर नागतूरे, सचिन क्षिरसागर , विनोद महाकुलकर, मंगल भोंगळे,राजु बोबडे, विजय गुडदे, गजेंद्र थेटे, संजय चिंचोलकर, गणेश दोडके, भगवान दुरुटकर उपस्तीत होते.

स्मारक स्थळी वृक्षारोपण, करून अभिवादन.

आज श्री संत गाडगेबाबा स्मारक निळापूर रोड येथे संत गाडगेबाबांच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण करून बाबांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here