युवा शेतकऱ्याची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या.

0
528

युवा शेतकऱ्याची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या…

लोकवाणी जागर.

मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथील युवकाने दुसऱ्याच्या शेतातील विहरित उडी घेउन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव गोपाल मधुकर ठाकरे वय अंदाजे 40 असे आहे.

मांगरुळ ते कोलगाव रस्त्यालगत डाखरे यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये गोपाळ ने आत्महत्या केल्याची बातमी गावात कळताच पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. गोपाळ काल पासून घरून बेपत्ता होता. गोपाल ने गावातीलच मुलीशी विवाह केला आहे, परंतु कौटुंबिक वाद व गोपाळ च्या स्वभावामुळे पत्नी आई कडे असल्याची चर्चा आहे, तर त्याला एक सात वर्षीय मुलगी आहे.

गोपाळ हा आईवडिला साठी एकटाच मुलगा असुन पाच एकर शेत जमीन चा मालक होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here