मारेगाव येथे भारत सरकाच्या कृषी धोरणाचा धरणे आंदोलन करुन जाहीर निषेध ….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे निवेदन…
अस्मानी, सुलतानी व महागाईने त्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकरी आक्रमक.
लोकवाणी जागर
मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथे शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी एक दिवशीय जाहीर निषेध व धरणे आंदोलन शेतकऱ्यांकडून करण्यात आले.
सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांचा वाली कोणी उरला नाही. १०/१२ हजार रु. जाणारा कापूस ७ हजारावर आला आहे. सी. सी. आय खरेदी मोजक्याच कापसाची करीत आहे. तीच परिस्थिती सोयाबीनची आहे. चार हजार रुपयाची खालची खरेदी चालू आहे नाफेड मोजकेच सोयाबीन खरेदी करीत आहे. सोयाबीन व कापूस विका साठी शेतकऱ्याना मोठी कसरत करावी लागत आहे. पिकविलेले विकावे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.वरून निसर्ग खालून सरकार बाकी बाजूंनी महागाई शेतकऱ्यांना त्रस्त करत आहे मागील वर्षाचे विम्याचे पैसे तसेच या वर्षी अति वृष्टी झालेले नुकसान पंचनाम्या नंतरही विमा रक्कम खात्यात जमा झाली नाही.
आज सतेत असलेले काल ज्या भावाची मागणी करीत होते, तो भाव दहा वर्ष उलटूनही सता धारी देऊ शकले नाही. स्वामिनाथन आयोग असो की, शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करणे असो, शेतीच्या बांधावर रस्ता असो, याबाबतीत सत्ताधारी आणि विरोधकांनी आळी पाळीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे व कोरडे आश्वासन दिल्याचे निवेदनात नमूद करुन. शासन व विरोधकांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावी यासाठी मांगरुळ येतील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करून सरकारचा व विरोधी पक्षाचा निषेध केला.
सरकार घोषणा करून विमा रक्कम प्रत्येक्षात वर्ष उलठून हि पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांचे चोही बाजूने शोषण चालू आहे याचे निषेधा साठी व सत्ताधारी व विरोधक यांना गेल्या निवडणुकीत केलेल्या आश्वासनाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे व कापसाला १०,००० (अक्षरी दहा हजार रु.) भाव व सोयाबीन ला ७००० (अक्षरी सात हजार रु.) भाव करिता मंगरुळ येथील शेतकरी बांधवांनी सत्ताधारी व विरोधी यांच्या भूमिकेचा निषेध करीत आंदोलन केले यावेळी तुळशीदास वटे, लक्ष्मण ठेंगणे धनंजय वटे, मिलिंद वटे, रवि पोटे,अतुल वटे, नेताजी आंबटकर , मोहन ढमणे, ज्ञानेश्र्वर वटे , सचिन खडसे, वामन भोयर , वासुदेव रोडे, रविंद्र डाखरे, सुधीर वटे, श्रीराम ठेंगणे, श्याम घोटेकर, गणेश पोर्टे, मंगेश मोहीतकर, मोहन ढोके, प्रवीण आस्वले, पंकज कोल्हे, प्रदिप घोटेकर, प्रवीण मुरस्कर, नैतिक वटे, प्रभाकर डाखरे व असंख्य शेतकरी उपस्थित होते.