जेसीआयचा वणीत पदग्रहण सोहळा संपन्न.
अध्यक्षपदी अभिषेक चौधरी तर सचिवपदी जयंत पांडे यांची निवड.
राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
व्यक्ति मत्व विकासाकरिता नेहमी अग्रेसर असणारे ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल ची वणी शाखा ( ) चा १२ वा पदग्रहण सोहळा स्थानिक वसंत जीनिंग हॉल वणी येथे शनिवारी 21 डिसेंबर 2024 ला संपन्न झाला. यात अध्यक्षपदी जेसी अभिषेक दीपक चौधरी सचिवपदी एचजीएफ जयंत पांडे व कोषाध्यक्ष पदी जेसी नमिष काळे यांनी पदभार स्वीकारला.
कार्यक्रमाची सुरुवात दर्पण भाई बरडिया यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.. यावेळी मुख्य अतिथी म्हणून समाजसेवी विजयबाबू चोरडिया व प्रमुख अतिथी म्हणून झोन अध्यक्ष खऋर डॉ. कुशाल जी झंवर झोन उपाध्यक्ष खऋट रुपेश जी राठी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.. मावळते अध्यक्ष एजीएफ यश श्रीवास्तव यांनी त्यांच्या 2024 अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील झालेले कार्यक्रम व विभिन्न उपक्रमांचा अहवाल सभेसमोर प्रस्तुत केला तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष जेसी अभिषेक दिपक चौधरी यांना शपथ, कॉलर, पिन देत पदभार सोपवला. संचालक व्यवस्थापनपदी जेसी भूषण कोंडावर, संचालक कार्यक्रम पदी जेसी संजीव गुप्ता, संचालक व्यवसाय पदी जेसी पंकज कासावार, संचालक प्रशिक्षण पदी जेसी सुमित कुरेवार, संचालक जनसंपर्क पदी जेसी आशिष डंभारे, व फर्स्ट लेडी प्रीती अभिषेक चौधरी यांनी शपथ ग्रहण केली.. समारंभात प्रतीक काकडे, सीए कमल मदान, आशिष घाटोळे, शीतल घटोळे, रोनक तातेड, हितेश पावडे, पवन बोधनकर, प्रज्वल ठेंगणे, शुभम जैन, रुपल जैन , दीपेश झामड, अक्षय देठे, प्रणव पिंपळे, कुणाल सुत्रावे, साहिल वासेकर, सौरभ राजूरकर, कुणाल चोरडिया यांनी नवीन सभासदाची शपथ घेतली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जेसी डॉ. अक्षय तुगनायत, जेसी रवी हनुमंते, जेसी मीनल कुरेवार, जेसी प्रशंसा श्रीवास्तव, जेसी तनुश्री पांडे, जेसी नवीन पोपली, जेसी भूषण कोंडावार, जेसी संजीव गुप्ता यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत ने झाली.