वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
मारेगाव तालुक्यातील केगांव येथील घटना….
लोकवाणी जागर..आज संपूर्ण राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा शक्यता वर्तविण्यात आली होती, त्यात यवतमाळ जिल्हयातील मारेगाव तालुक्यातील शेतकरी महिला मेघा गणपत पानघाटे (वय 45, व्यवसाय – शेती, रा. केगाव, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ) या शेतातून कापूस वेचून परतत असताना त्यांच्यावर वीज कोसळली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मारेगाव तालुक्यातील केगाव येथे वीज पडल्यामुळे शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आज, शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
मेघा यांच्या पश्चात पती, एक विवाहित मुलगी, व एक मुलगा आहे. या घटनेत आणखी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मौसम विभाग नागपूर यांनी दिनांक २४.१२.२०१४ रोजी निर्गमित केलेल्या हवामान अंदाजानुसार जिल्हयात दि. २७/१२/२०२४ व २८/१२/२०२४ रोजी काही भागामध्ये विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे कळविले आहे. या कालावधीत विज पडुन होणारी जिवित हानी व वादळी वा-यामुळे घरांची भिंत, टिनपत्रे पडुन होणारी जिवितहानी व वित्त हानी टाळण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून “काय करावे काय करू नये” याबाबत मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रशासनाचे वतीने याव्दारे निर्गमित करण्यात येत आहे.
वादळी वारा/ विजा चमकत असल्यास घरात असल्यास काय करावे आणि काय करु नये.
१. घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा,२. घराच्या दरवाजे खिडक्या, कुंपणापासून दूर राहा.३. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच रहावे. घराबाहेर असल्यास :-४. त्वरित सुरक्षित निवा-याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे.५. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांचेपासून दूर रहा.६. गाडी चालवीत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा.७. उघडयावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणुन लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व
डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. ८. जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा,९. मोकळया तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दुर रहा.१०. जंगलामध्ये- दाट, लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा.११. इतर खुल्या जागेवर : दरीसारख्या सुरक्षीत खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा. अश्या सूचना यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.