सुट्टीच्या दिवशीही मारेगावचे तहसीलदार कर्तव्यावर , स्वतः घाटावर जात रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या.

0
425

सुट्टीच्या दिवशीही मारेगावचे तहसीलदार कर्तव्यावर,  अंधारात सात किलमीटरवर पायदळ चालत  जात रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या.

कोसारा रेती घाट परिसरातून अवैध्य रेती वाहतूक करणारे तिन ट्रक जप्त…

राजु तुरणकर मारेगाव : दिवसेंदिवस रेती तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मारेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी केली जात आहे. एकाच पावतीवर अनेकदा सुरू असलेल्या हा अवैध प्रकार महसूल विभागाने उघडकीस आणला असून तहसीलदार निलावाड यांच्या पथकाने रविवारी कोसारा घाट परिसरातून तीन ट्रक जप्त केले आहे.

वर्धा नदी घाटातून रेती ची तस्करी सर्वश्रुत आहे. मात्र, तहसीलदार उत्तम निलावाड यांनी ही तस्करी कशी रोखता येईल यावर भर देत अनेकदा अनेक मार्गाने होणाऱ्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली आहेत. परंतु तरीही रेतीची तस्करी थांबलेली दिसत नाही. रात्रीच्या वेळी तर या वाहतुकीला मोठा जोर पकडलेला असतो. एकामागे एक गाड्यांची रांग लागलेली असते. एवढेच नाही तर दिवसाही बिनधोकपणे रेतीची तस्करी केली जात असल्याचे दिसून येते. हा सर्व प्रकार सामान्य नागरिकांना दिसून येतो. असे असताना प्रशासनाला दिसू नये, याचे आश्चर्य व्यक्त केले असताना रविवारीच्या रात्री तहसीलदार यांनी तीन ट्रक जप्ती करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावले आहे. वर्षाच्या अखेरीस करण्यात आलेल्या या धडक कारवाईने खळबळ उडाली आहे.

वर्धा नदीच्या काठावर असलेल्या गावातून ही रेती रात्रीच्या वेळी ट्रक ट्रॅक्टरने मारेगाव सह ग्रामीण भागात आणली जाते. अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे. येथे वापरण्यात येणारी जवळपास सर्वच रेती चोरीची असल्याचे बोललं जात आहे. असे असताना महसूल विभागाने रेती तस्करी वर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. रेती तस्करी करणारे तीन ट्रक जप्त केले आहे. यामध्ये टिप्पर क्रमांक (एम.एच.29, टि.1680), टिप्पर क्रमांक (एम.एच. 13 ए एक्स 2093) आणि टिप्पर क्रमांक (एम.एच.29 टि. 1661) असा आहे. हे टिप्पर कोणाच्या मालकीचे आहेत याबाबतचा उलगडा अजुन पर्यंत झालेला नाही. ही कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड, प्रशांत डंगारे, वाहन चालक विजय कनाके, तलाठी नाईक, कोतवाल दिलीप पचारे, कोतवाल चांदेकर, पोलिस पाटील प्रेमदास गाणार यांनी केली.

सुट्टीचा दिवस, काळोखी रात्र, रेती तस्करी माफियांच्या मोरक्यांच्या नजरा चुकवत तब्बल पाच किलोमीटर पायदळ शेतीचे रस्त्याने हातात प्लास्टिक काठी, शेतात जंगली प्राण्यांसाठी लागलेल्या झटका मशीन पासून स्वतः ला वाचवत वर्धा नदीवरील कोसरा घाट परिसरात अवैध वाळू जप्तीची कारवाई .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here