गुरुमाऊली उपासना मंडळातर्फे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांचा सत्कार.

0
524

श्री गजानन महाराज गुरुमाऊली उपासना मंडळातर्फे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांचा सपत्निक सत्कार.

नववर्षाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन.

राजु तुरणकर – संपादक.

नवीन वर्षाचे औचीत्य साधून श्री गजानन महाराज गुरुमाऊली उपासना मंडळ छोरीया लेआऊट गणेशपुर येथील महिला मंडळाने हनुमान मंदिर परिसरात नवनिर्वाचित आमदार यांचा सपत्निक सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मागील तीन वर्षापासून दर गुरुवारी गजानन महाराज पोथीचे वाचन या महिला मंडळाच्या वतीने, गुरुमाउली उपासना महीला मंडळ  हे संताचे वीचार जनमानसात रुजावे हिंदु संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून त्या या मंदिर परिसरात नित्यनेमाने कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शहीद लेफ्टनंट जनरल स्वर्गीय वासुदेवराव दामोदरराव आवारी यांचे वडील ह.भ.प . डॉ दामोधर आवारी तर कार्यक्रमाचे सत्कारमुर्ती आमदार संजय देरकर आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थीती किरण ताई देरकर- मुख्य अतिथी विजयाताई आवारी, प्रमुख पाहूणे- माजी उपजील्हाप्रमुख, दीपक कोकास, अमरदिप दुर्गा उत्सव मंडळ छोरिया लेआऊट अध्यक्ष अभिषेक भसीन, रिचा भसीन,  कुसुम सावे, प्रशांत खारकर उपसरपंच गनेशपुर, माजी तालुकाप्रमुख गणपत लेडांगे , तालुका प्रमुख रवि बोढेकर, सामाजिक कार्यकर्ते गुलाब आवारी, महीला उपजिल्हा संघटीका डीमन टोंगे, माजी शहर प्रमुख राजूभाऊ तुराणकर, मनीष बत्रा, भारती बत्रा, बंडू टोंगे, सविता आवारी, मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुरुवातीला दीप-प्रज्जवलन व संत गजानन महाराज व जगन्नाथ महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरूवात कऱण्यात आली.त्यांनतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गुरुमाऊली उपासना मंडळाच्या सचिव सुनंदा गुहे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अपर्णा मस्की, अमित अग्रवाल , अनु अग्रवाल, सुमन बोढे, सुनीता खामनकर, लता जीवने, शोभा वरारकर, छबु वासाडे, रेखा गुरुकर , अर्चना येरणे, शोभा पाटील, स्वाती पाटील, मीनाक्षी शर्मा, वंदना पारखी, मीना बडवाईक, आशा बडवाईक, किरण टोंगे, रेखा खंगार , राधा कोसारकर , सपना सरमुकदम, सुरेखा मोरे ,शोभा देठे ,प्रीती ठाकूर, इंदिरा ढोके, साक्षी गटलेवार, मनोरमा राजुरकर, दमयंती ठेंगणे, माला राखुंडे, विमल सहारे ,मंदा करंडे, रेखा भानारकर , गुंडावार काकू , डाहुले काकू , मीनाक्षी मोहिते, सुषमा बोंडे, पूजा रामगीरवार, प्रांजली भेंडाळे, संगीता मुरस्कर, वनिता पिदुरकर ,अलका बोबडे, गीता बोबडे ,सीमा चांदवडकर, प्रिया दुधे, मंदा बिनगुले, शकुंतला किडीले, मंगला बरशेट्टीवार ,तुळसा ठाकरे व आशा पांडे यांनी  मेहनत घेतली.

मंडळाच्या अध्यक्षा सुमनताई बोढे व कुसुम सावे यांचा सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन साठी मनीष बत्रा व सूनंदाताई गुहे यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here