मुकुटबन ग्रामपंचायत सरपंच पाच लाख रुपये एमबी न करता उचल केल्याची तक्रार.
सरपंच मीना आरमार यांच्यावर कारवाई करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार.
राजू तूरणकर/वणी.मुकुटबन : झरी तालुका तील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले मुकुटबन ग्रामपंचायत ने घनकचरा चे काम निष्कृष्ट दर्जाचे केल्या असल्याचे व एमबी न बनवता पाच लाख रुपये उचल केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता पंकज रमेश मुद्दामवार यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
मुकुटबन ग्रामपंचायत मध्ये घनकचरा व्यवस्थापनातील अंदाजे 32 लाखाचे कामाचे ई-निविदा लावण्यात आले ह्या कामाचे ई-निविदा टेंडर निखिल काळे ह्या कंत्राटदाराला मिळाला . निष्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून काम पूर्ण न करता पाच लाखाचे उचल केले . ग्रामपंचायत सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांनी पाच लाख रुपये उचल केले आहे. ह्या कामात चुरी वापरून काम केले आहेत. तसेच ह्या पाच लाख रुपये परस्पर उचल केल्याबद्दल गट विकास अधिकारी यांच्याकडे चौकशी करण्यात येवून सचिव , सरपंच , कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही करण्याबाबतची तक्रार गट विकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
त्या कामाची संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणत्याच प्रकारचे देयके कंत्राटदाराला देण्यात येऊ नये व कामाची तपासणी करून संबंधित सरपंच ,सचिव यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता पंकज मुद्दामवार यांनी केली आहे.
गटविकास अधिकारी काय कारवाई करणार, मुकुटबन मधील घनकचरा कामाची चौकशी न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.