यंग इंडिया ऑफआंबेडकर राईट मुव्हमेंट च्या वतीने पळसोनी येथे विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप.
क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.
राजु तुरणकर – संपादक.
यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट च्या वतीने,विद्येची देवता माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त,विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप.
३ फेब्रुवारी रोजी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मोमेंटच्या वतीने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळसोनि येथे विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शाळेच्या मुख्याध्यापिका परसावर मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पळसोनी ग्रामपंचायत च्या सरपंच नलिनी दुधबळे, उपसरपंच पुखराज खैरे व यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट च्या सदस्य काजल वाळके, प्रेम अडकिने, श्वेता माहुरे, अंकिता पथाडे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन माननीय गजानन मडई सर यांनी केले व आभार माननीय आकाश खोब्रागडे सर यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले व काजल वाळके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भर टाकत त्यांचे आपल्यावर असलेले उपकार हे अमोलनिय आहे असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून मांडले व प्रेम अडकिने सर यांनी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटचे ध्येय काय आहे व महापरिनिर्वाणदिनी मिळालेल्या शालेय उपयोगी वस्तूचे वाटप कशा पद्धतीने होईल यावर विश्लेषण करून आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी आयोजित “एक पेन एक वही” या उपक्रमात आलेल्या शालेयउपयोगी साहित्याचे वाटप शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे मार्गदर्शक माननीय हेमंत टिपले सर व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग तसेच यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट चे सर्व सन्माननीय पदाधिकारी रज्जत सातपुते, आकाश बोरकर, सुरज खैरे, गौरव जवादे, आदित्य वाळके, अश्विनीताई अडकिने, ऋचाताई दारुंडे,राहुल घोस्की, इस्माईल खान उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वर्गशिक्षकांनी आपला फीडबॅक दिला व मुख्याध्यापिका परसवार मॅडम यांनी उपक्रमाचे कौतुक करून लेटर पॅड वर वितरित झालेल्या शालेय उपयोगी वस्तूचे लेखी स्वरुपात शुभेच्छा पत्र दिले.