वणी शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस, भर चौकात रात्री घेतला एकाला चावा.

0
605

छत्रपति शिवाजी महाराज चौकात कुत्र्याने घेतला चावा. शहारत कुत्र्यांचा हैदोस.

युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केली तात्काळ मदत.

राजु तुरणकर – संपादक.

वणी शहर परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून लोकांना फिरताना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. संबंधित नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.

छत्रपति शिवाजी महाराज चौकात मध्यप्रदेश बुऱ्हाणपूर येथून आपले कापूस गाठीच्या कामानिमित्त आलेले प्रवीण पुंडलिक भालेराव हे पायदळ चालत असताना काल रात्री 9 वाजता दरम्यान एका कुत्र्याने अचानक हल्ला करीत दोन्ही पायांना चावा घेतला. ही बाब युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी आपले गाडीने त्याला शिवसैनिका सोबत तात्काळ ग्रामीण रुग्णालयात पाठवून उपचार करवून घेतले. 

वणी शहराची काही वर्षापासून लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या बाहेरील लेआऊट मध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला जात असतात त्यांना रस्त्यावरून जात असताना भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे. काही वेळा ही कुत्री वाहनधारक व सायकल स्वरांचा पाठलाग करून अनेकांना चावलेल्या घटनाही घडलेल्या आहेत.

छत्रपति शिवाजी महाराज चौक या परिसरात अनेक खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, दुकाने असल्याने येथे खवय्यांची नेहमीच गर्दी असते. खाद्यपदार्थांच्या हातगाड्या वरील खरकटे व दुकानातील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट न लावता याच परिसरात टाकण्यात येते त्यामुळे भटकी कुत्री या ठिकाणी जास्त प्रमाणात येत असतात.

प्रशासनाचे दुर्लक्ष – अजिंक्य शेंडे.

परिसरातील स्वच्छता कचरा वेळेत उठाव न करणे त्यामुळे अन्नपदार्थ शोधण्यासाठी कुत्रे येतात तसेच भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण होत नसल्याने दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढू लागली आहे संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे ही गरज असून पालिकेकडे पाठपुरावा करून लवकरच भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील राहू.भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा लागेल – अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख वणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here