” थोडस जगणं समाजासाठी” उपक्रमा अंतर्गत दर महिन्याला एका गरजवंताला मदत..
गुणवंत पचारे सरांचा संताच्या विचारांचा सातत्यपूर्ण कृतिशील उपक्रम.
राजु तुरणकर – संपादक.
सलग सोळा वर्षे आपले पगारातून निराधार गरजवंत कुटुंबाला सकस अन्नधान्य दान देण्याचा उपक्रम वणी तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या गुणवंत पचारे या ध्येयवेड्या शिक्षकाने आपल्या हाती पडणाऱ्या मासिक पगारातील चौथा भाग हा तालुक्यातील तथा परिसरातील निराधार, निराश्रीत कुटुंबाला महिन्याभराचा किराणा व धान्य देऊन सहकार्य करण्याचा संकल्प केलेला आहे.
या उपक्रमांतर्गत काल दि. ८जानेवारी २०२५ ला नरसाळा येथील सोनाक्षी योगेश उईके इयत्ता सहावी जि.प.उच्च प्राथ.शाळा नरसाळा येथे शिकत असलेली विद्यार्थिनी व यवतमाळ जिल्ह्यातील महादीप परीक्षेत गुणवत्ता प्राप्त झालेल्या या गरीब मुलीच्या कुटुंबातील आजी आजोबाला महिन्याभराचा किराणा (काजू बदामासहित) अन्नधान्य, साडीचोळी, ग्रामगीता ग्रंथ, महापुरुषांचे पुस्तक भेट देऊन सहकार्य करण्यात आले याप्रसंगी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. मारोतराव ठेंगणे, ज्ञानेश्वर कडुकर, प्रमोद राजूरकर, जनार्दन सुर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) तथा नरसाळा येथील नागरिकांची उपस्थिती होती.