दोन गो मातेचे कापलेले मुंडके रस्त्यावर, परीसरात खळबळ.

0
2491

गो मातेचे कापलेले मुंडके रस्त्यावर आढळल्याने परीसरात खळबळ.

दिपक चौपाटी परीसरात लागून असलेल्या मटण मार्केट जवळील प्रकार. शेकडो गोमाता कापल्या गेल्याची शंका.

लोकवाणी जागर..

दिपक टॉकीज चौक परिसरात गौमातेचे भरपूर मोठ्या प्रमाणात मास रस्त्याच्या बाजूला फेकलेले आढळून आले आहे. दोन गो मातेचे मुंडके सुद्धा या ठिकाणी आढळून आले आहे. सदर ठिकाणी युवासेना, शिवसेना, बजरंग दल कार्यकर्ते मोठया प्रमाणात जमा झाले असता परिसरात खळबळ उडाली आहे. अजिंक्य शेंडे, ललित लांजेवार, संतोष लक्षेट्टीवार, रोहन पारखी, संकेत ठाकरे, संजोग झाडे, कुणाल कुरेवार हे मोठ्या प्रमाणत असंख्य कार्यकर्ते येवून रोष व्यक्त करीत आहे.

सर्व कार्यकर्ते परिसर शोधून काढले असता झाडे झुडपाच्या मधात असलेल्या झोपड्यामध्ये मागील अनेक दिवसापासून हा प्रकार सूरू असल्याचे दिसुन येत आहे.या ठिकाणी शंभर चे वर गायी कापल्या गेल्याचे शंभर चे वर मुंडके पडून असल्याने सिद्ध झाले आहे. तरीपण हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले नाही, ही बाब सुद्धा शंका निर्माण करणारी आहे. सदर ठिकाणी ज्यांच्या झोपड्या आहे. त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, यांनी केली आहे. पोलीस प्रशासन येऊन करवाई करत आहे.

रामनवमी समितीच्या वतीने सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असुन, याविरोधात लवकरच आंदोलन करणार असल्याचे रवि बेलुरकर यांनी लोकवाणी जागर ला सांगीतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here