गोहत्या प्रकरणातील गांभीर्य ओळखून संजय देरकर यांनी प्रत्यक्ष केली घटना स्थळाची पाहणी, पाहणी करतांना आमदार पोलीस प्रशासनावर झाले संतप्त.
आरोपींना तात्काळ अटक करुण संपूर्ण प्रकरणाचे मूळ तपासण्याचे पोलिसांना दिले आदेश.
राजु तुरणकर – संपादक.
वणी : – काल संध्याकाळी शहरातील दिपक टॉकीज परिसरातील बार जवळ दोन गो मातेचे मुंडके पडून असल्याची वार्ता गावात काटेरी झुडपाच्या घनदाट परिसरात कुंटनखाण्याजवळ टिन पत्र्याचे शेड उभारून त्यात मागील अनेक वर्षापासून गोहत्या करून त्यांचे मास तस्करी केल्या जात असल्याच्या प्रकार आज तारीख ११ जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे. गोहत्या केलेल्या गायींचे मुंडके व मास आढळल्याने संपूर्ण वणी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, बजरंग दल, शिवसेना कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे.
जत्रा मैदानातील तलाव समोरील नव्याने उभारण्यात आलेल्या मटण मार्केट मागील बाजूस प्रचंड मोठ्या जागेवर ऑस्ट्रेलियन काटेरी बाभुळींचे झाडे आहेत. त्या झाडांच्या आडोश्याचा फायदा घेत गोमांस तस्करांनी टिन पार्टीचे मोठे शेड उभारून त्यात गोहत्या करून त्यांचे मास बाजारात विक्री करीत होते. त्या शेड परिसरात शेकडे गायींचे कुजलेले मुंडके, हाडे, व जनावरांच्या पोटातील फेकावू वस्तू तसेच चांबडे आढळून आले आहे.
वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय भाऊ देरकर यांनी गोमास तस्करीचे गांभीर्य ओळखून, प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करण्यासाठीं पोहचले, त्या ठिकाणी वास्तव स्वरूप पाहून अनेक शेकडो गायांची कापलेली मुंडके, पडलेली चामडी कुजलेल्या अवस्थेत पडून होते, तो सर्व प्रकार पाहून संजय देरकर संतप्त झाले. पोलीस प्रशासनाला धारेवर धरीत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून गोहत्या बंदी कायदा असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोमास तस्करी कशी सुरू होती तर पोलीस प्रशासन अनभिज्ञ कसे होते. याची चौकशी झाली पाहिजेत व सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे अशी ठणकावून भुमिका घेतल्याने , यामध्ये असलेले मोठे मासे अडकतील अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
येथील गोमांस तस्करी रोखण्यासाठी विधानसभेत आवाज उचलणार असल्याचे यावेळी आमदार संजय देरकर यांनी सांगीतले. यावेळी त्यांच्या सोबत अजिंक्य शेंडे, राजु तुरानकर, संजय देठे, भगवान मोहिते, प्रवीण खानझोडे, मनीष बत्रा , प्रशांत पाचभाई, डॉ जगन जूनगरे, विवेक ठाकरे,उपस्तीत होते.