गोहत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – रामनवमी उत्सव समिति.
वणीतील गोमांस तस्करीचे पायमुळे खोदून काढा अन्यथा आंदोलन. पोलिसांनी आरोपींना अटक करुण केली सुटका..
लोकवाणी जागर.
गोहत्या करुन गाईचे शिर व मांस कापून रस्त्यांवर फेकण्यात आले. तसेच २०० च्या वर कापलेल्या गोवंशची हाडे आढळून आल्याची घटना दि. ११ जानेवारी २०२५ रोजी वणी शहरामध्ये उघडकीस आली.
या घटनेचा रामनवमी उत्सव समिती कडून तिव्र निषेध करण्यात आला असून हे कृत्य ज्यांनी कोणी घडवून आणले असेल त्यांना अटक करुन त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रभु श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपविभागीय अधिकारी वणी, उपविभागीय पोलिस अधिकारी वणी यांच्याकडे दिनांक १२ जानेवारी ला करण्यात आली.
वणी विधानसभेत भविष्यात गोहत्या करण्याचे धाडस कोणी करणार नाही त्यासाठी कठोर शिक्षा गोहत्या करणाऱ्यांना देण्यात यावी, अन्यथा भविष्यात रामनवमी उत्सव समिती गोहत्या करणाऱ्यांच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी कुंतलेश्वर तुरविले, प्रणव पिंपळे , नितीन बिहारी , बालाजी भेदोडकर , प्रवीण पाठक ,नितीन भटगरे , प्रणित महाकरकार , कमलेश त्रिवेदी , तुषार घाटोळे , विजय मेश्राम , पवन खंडाळकर, चैतन्य तुरविले, भारत रामगिरवार, निशिकांत देशपांडे, आकाश उईके, हर्षल बिडकर , अमर कनकुंटलवार , कुणाल कृष्णावार यांच्या सह सर्व प्रभु श्रीराम नवमी उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
संशयित आरोपींना वणी पोलिसांनी काल तात्काळ अटक केली, व आज सुटका केल्याने गावात हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे.