साउथ एशिया माँस्टर अँथल्यँटीक स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्यातील खेळाडूंची दमदार कामगिरी.
साउथ एशिया माँस्टर अँथल्यँटीक ओपन चँपियनशिप मंगलोर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत यवतमाळच्या खेळाडुंनी राखली भारताची शान.
राजु तुरणकर – संपादक.
साउथ एशिया माँस्टर अँथल्यँटीक ओपन चँपियनशिप स्पर्धा मंगला स्टेडियम मंगलोर (कर्णाटक) येथे संपन्न झाली.या स्पर्धेत यवतमाळच्या एकूण 20 महिला व पुरूष खेळाडूंनी सहभाग नोंदवून भारताचे प्रतिनिधित्व करून खेळामध्ये दमदार प्रदर्शन केले आहे.
यामध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे यांनी 58 वर्ष वयोगटात मधे हरडल्स (अडथळा शर्यत), 100 मिटर धावणे मधे ब्राझ मेडल , 45 वयोगटात शुभांगी पजगाडे यांनी हँमर र्थो मधे ब्राँझ मेडल, ज्योती वरघणे यांनी थाळी फेकमधे सिलव्हर मेडल 75 वर्ष वयोगटात वेणूताई मोहतूरे यांनी 100 मिटर धावणे स्पर्धेत ब्राँझ मेडल प्राप्त केले. व भारतामधे यवतमाळ जिल्ह्याचे नाव लौकिक केले.
सदर स्पर्धेत श्रीलंका , भुतान, नेपाळ, बाँग्लादेश, व भारत येथील एकूण 2500 खेळाडूंनी विविध खेळात सहभाग नोंदवून नैपुण्य दाखवीले .विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन एशियन गेम सेक्रेटरी उदयकुमार शेट्टी, प्रेसिडेंट चेअरमन लवान डी सुझा ,प्रेसिडेंट सुरेंद्रा शेट्टी यांनी करून खेळाडूंना मेडल व मेरीट सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.
वरील खेळाडूंनी साउथ एशिया माँस्टर अँथल्यँटीक ओपनचँपीयन शिप मधे भारत देशाचे प्रतिनिधित्व करून भारताला 4 मेडल प्राप्त करून दिले .त्यांच्या यशाचे कौतुक व शुभेच्छा माँस्टर अँथल्यँटीक असोसिएशन यवतमाळ अध्यक्ष गुलाब भोळे, सेक्रेटरी सचिव नरेंद्र भांडरकर, देवेंद्र चांदेकर, समता साहित्य अकादमी चे भारतीय अध्यक्ष देवेंद्र तांडेकर साहेब, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त , आंतरराष्ट्रीय खेळाडू, पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राठोड, प्रा. शितल दरेकर, महिला अध्यक्ष शिलाताई पेडणेकर, अविनाश लोखंडे, सचिन दरेकर, जितेंद्र सातपुते सर, सचिन भेंडे सर, मिहिर सर, यवतमाळ मतदार संघाचे मा.आमदार बाळासाहेब मांगूळकर, वणी मतदार संघाचे मा.आमदार संजयभाऊ देरकर, तसेच संस्कार व्हाँलीबाल क्रीडामंडळ वणीचे पदाधिकारी खेळाडू, प्रशिक्षक संतोष बेलेकर सर, रूपेश पिंपळकर , विविध खेळ संघटनेने अध्यक्ष यांनी अभिनंदन करून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याने त्यांच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सेवानिवुत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे, ज्योती वरघणे, वेणूताई मोहतूरे, शुभांगी पजगाडे, या खेळाडूंवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.