सचिन चिकटे यांची प्रकृती चिंताजनक, रूग्णालयात रवानगी
भ्रष्टाचार उघडकीस होणार या धाकाने अधिकारि धास्तावले, तिन दिवसापासून गट विकास अधिकारी बेपत्ता..
राजु तुरणकर – संपादक.
नांदेपेरा शिपाई पदभारती परिक्षेत झालेल्या गैरप्रकारांवर प्रकाश टाकण्यासाठी दोन परीक्षार्थी यांनी दिनांक 15 जानेवारी 2025 पासुन उपोषण सुरू केले आहे. पैकी सचिन तुळशीराम चिकटे यांची अचानक तबीयत बिघडल्याने त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ कमलाकर पोहे यांनी तपासणी करुण रुग्णालयात उपचारासाठी रवानगी केली.
नांदेपेरा ग्रामपंचायत शिपाई पद भरतीत परिक्षेत पूर्वनियोजित कटकारस्थान करून ज्या उमेदवाराला पास करायचे होते, त्याला पास करण्याचे उद्देशाने परीक्षेमध्ये त्याला सर्व सवलती पुरविल्या व अकार्यक्षम उमेदवाराला पास केल्या गेल्याच्या आरोप उपोषणकर्त्यांचा आहे.
त्यामुळें उपोषण कर्त्यानी मागण्या मान्य करुण फेरपरीक्षा घेण्यात यावी ही मागणी घेवुन मागील तीन दिवसापासून उपोषण करीत असलेले सचिन चिकटे यांची अचानक तबीयत बिघडल्याने त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करुण रूग्णालयात उपचारासाठी रवानगी करण्यात आली.
मागील तिन दिवसापासून सूरू असलेल्या उपोषण मंडपाला कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही, त्यामुळे जनमानसात अधिकारी भ्रष्टाचार उघड होईल या भीतीने धास्तावल्याची चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे. त्यामुळे तो अधिकारी दोन दिवसापासून फरार झाला असल्याचे दिसुन येत आहे.