आमदार संजय देरकर यांनी नारळ पाणी पाजून सोडले उपोषण.

0
302

आमदार संजय देरकर यांनी नारळ पाणी पाजून सोडले उपोषण.

आमदारांचा शब्द, उपोषण कर्त्याना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन.

राजु तुरणकर – संपादक.

नांदेपेरा शिपाई पदभारती झालेल्या गैरप्रकारांवर प्रकाश टाकण्यासाठी सूरू असलेले उपोषणाचा आज तिसरा दिवस होता.

नांदेपेरा ग्रामपंचायत शिपाई पद भरतीत परिक्षेत पूर्वनियोजित कटकारस्थान करून ज्या उमेदवाराला पास करायचे होते, त्याला पास करण्याचे उद्देश उद्देशाने परीक्षेमध्ये त्याला सर्व सवलती पुरविल्या व अकार्यक्षम उमेदवाराला पास केल्या गेल्याच्या आरोप उपोषणकर्त्यांचा होता.

त्यामुळें उपोषण कर्त्यानी मागण्या मान्य करुण फेरपरीक्षा घेण्यात यावी ही मागणी घेवुन मागील तीन दिवसापासून उपोषण करीत असलेले सचिन चिकटे यांची अचानक तबीयत बिघडल्याने त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करुण रूग्णालयात उपचारासाठी रवानगी करण्यात आली होती.ही वार्ता आमदार संजय देरकर यांना कळताच त्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली व उपोषण कर्ते प्रवीण खैरे यांच्याशी चर्चा करून बाजू समजून घेत, त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले व या अन्यायाच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करून न्याय मिळवून देई पर्यन्त सोबत असल्याचे सांगून नारळ पाणी पाजून उपोषण सोडण्यात आले. उपोषण कर्ते प्रवीण खैरे यांनी आमदाराच्या शब्दांना मान देत उपोषण सोडण्याचे मान्य केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमख संजय निखाडे, शरद ठाकरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, सुरेश शेंडे शिवसेना शाखा प्रमुख नांदेपेरा, सुधीर थेरे शहर प्रमुख वणी, प्रवीण खानझोडे, राजु तुरणकर माजी नगसेवक, मंगल भोंगळे, रुद्रा कुचनकर, अभिनंदन भेंडाळे  , संजोग झाडे, साहील ठमके, तुषार खामनकर, पवन कोडापे उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here