वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ देरकर यांच्या वाढदिवसा निमित्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
मांगरुळ येथील कार्यकर्त्यांच्या सामजिक उपक्रम .
राजु तुरणकर – संपादक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ येथे वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ देरकर यांच्या वाढदिवसानिमित्य सामजिक कार्यकर्ते अतुल वटे, शितल पोटे माजी सभापती- पं-स-मारेगांव, सरपंच प्रमोद आत्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर गेडाम, श्रीराम ठेंगणे अभिराज भोयर, जिवन वैद्य, राजु जेनेकर यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला कार्यकर्ता मंडळी, व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या संगिना टोंगे, रंजना टोंगे, अमृता धुगुल, निता राजूरकर, पंचफुला वाघमारे, वंदनाताई बल्की, स्वाती कोरझरे, मुख्याध्यापक डी डी ताजने, शिक्षक जी जी राऊत व बंडु लाडसे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.