प्रभु रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिन वणीत प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा .

0
104

प्रभु रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिन वणीत प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा.

शहीद भगतसिंग चौक परिसरातील युवकांचे महाआरती व महाप्रसादाचे आयोजन.

राजु तुरणकर – संपादक.

अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला वर्षपूर्ती झाल्याच्या आनंद दिव्य, भव्य, तेजस्वी, चकाचक अयोध्येत ओसंडून वाहत असताना वणीतील शहीद भगतसिंग चौक परिसरातील युवकांनी प्रतिष्ठा द्वादशी म्हणुन हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.

22 जानेवारी 2024 रोजी मागच्या वर्षी अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. हिंदू पंचांगानुसार, ही वर्षपूर्ती 11 जानेवारीला साजरी झाली, परंतु इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे 22 जानेवारीला या कार्यक्रमाची वर्षपूर्ती होती. त्या दिवशी संपूर्ण जगात अनेक मंदिरांमध्ये विशेष पूजा आयोजित करण्यात आल्या होत्या.

धार्मिक टवमान्यतेनुसार, प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यासोबतच व्यक्तीला मानसिक शांतता लाभते. हि भावना जोपासत वणी शहरातील शहीद भगतसिंग चौक रंगारीपुरा यांचे वतीने प्रभु रामचंद्रांच्या अयोध्या येथील मूर्तीच्या द्वादशी प्रतिष्ठा सोहळ्याचे निमित्ताने भव्य अश्या कार्यक्रमांचे आयोजन करीत प्रभु रामचंद्रांची आरती करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

या मंगलमय सोहळ्यासाठी मंगेश समर्थ, सचिन चामूलवार, मिलिंद बावणे, चेतन तोडक, यश सहारे, रोहित चामूलवार, साहिल सहारे, श्रीकांत डंबारे, सागर समर्थ, कौतुभ निखुरे, आदु बिलोरीय, ईश्वर सहारे, ओम सहारे, राहुल समर्थ, शिवा येरने, शुभम गोजे, सुरज मोहबिया, विशाल उइके, विनीत तोडकर,रोहित सहारे शहिद भगत सिंह चोक मित्र परिवार, रंगारी पुरा येथील अनेक गणमान्य नागरिक, महीला यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here