व्यापारी वर्गात खळबळ उडवून देणारी घटना.

0
83

व्यापारी वर्गात खळबळ उडवून देणारी घटना.घटना घडविणारा पडद्यामागचा सूत्रधार कोण ?

अंधाऱ्या रात्री दुकान पाडणे व चोरी प्रकरणी आरोपींची संख्या वाढणार का ?

अंधाऱ्या रात्री गुंड प्रवृत्तीने तोड फोड व चोरी करून कोणालाही कसे दिसले नाही. घटनेच्या जवळच मज्जित आहे. रहदारीचा रस्ता असून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे आणि रात्री पोलीस शहरात गस्त घालत असतात, तरीही दुकान पाडले व महत्वाच्या वस्तू चोरून नेल्या. म्हणजे शहरात पोलिसांचा धाक कमी झाला का ? की गुन्हा केला तरी काही होत नाही असं गुन्हेगाराला वाटत तर नसेल ना. शहरात अनेक चोऱ्या वाढल्या होत्या, त्याचा सुगावा अजूनही पूर्ण पणे लागला नाही. एका पत्रकाराचे मध्यरात्री वाहन जाळले तसेच एका पोलिसांच्या गाडीच्या काचा सुद्धा फोडल्या होत्या. मात्र अजूनही गुन्हेगाराचा शोध लागला नाही. पोलिस विभाग सर्व गुन्हाचा शोध लावणार का ? याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

 

मध्यरात्री जेसिबीच्या सहाय्याने दुकान पाडून कायदा हातात घेणाऱ्या ‘समिर’ सह दोघांना चक्क मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथुन वणी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आरोपींची संख्या पाच वर पोहोचली असून या पाचही आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जागेचा ताबा मिळविण्यासाठी आरोपींनी चक्क जेसीबी मशीनच्या साह्याने फर्णीचरचे दुकान जमीनदोस्त केले होते. हि घटना गुरुवारी दिनांक 12 ऑक्टोबर ला सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच या घटनेतील मुख्य आरोपी समिर परवेज रफीक रंगरेज(40) रा.एकता नगर काजी पुरा वणी हा फरार झाला होता. तेव्हा पासून वणी पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांच्या तपास यंत्रणेने तांत्रिक बाबीचा अवलंब करुन आरोपी समीर रंगरेज सह सोनु उर्फ शारिक रंगरेज व जावेद रंगरेज रा.एकता नगर काजीपुरा वणी यांना मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथून शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात भादवी चे कलम 457,380,427 नुसार गुन्हे दाखल केले. त्यानंतर या तिन्ही आरोपींना विद्यमान न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. याआधी जेसिबी चालक व वाहक यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

सविस्तर असे की, शहरातील टिळक चौक परिसरात पंकज भंडारी यांच्या मालकीचे नवकार फर्निचर नामक दुकान आहे आणि त्यांचा ताबा त्याजागेवर आहे. मात्र त्या जागेचा ताबा मिळावा याकरिता समीर रंगरेज याने कायदा हातात घेतला बुधवारी अंधाऱ्या रात्री जेसीबी मशिनच्या साह्याने दुकानाची प्रचंड नासधूस केली. यात तब्बल 18 लाख रुपयांचे नुकसान झाले तर एक लाख 70 हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार गुरुवारी वणी पोलिसात नोंदविण्यात आली. ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने गुन्हा दाखल केला. पोलीसांनी तपासाची चक्रे हालवून घटनास्थळी वापरण्यात आलेले जेसीबी मशिन व दोन ऑपरेटर यांना तात्काळ ताब्यात घेतले होते मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी मात्र पसार झाला होता. दरम्यान आरोपीला पकडण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते.

पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत आरोपीला मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे असल्याचे स्पष्ट होताच पोलीस उप निरीक्षक सुदाम आसोरे, विकास घडसे, सागर सिडाम, शुभम सोनूले, वसीम यांनी शुक्रवारी रात्री समीर रंगरेज, सोनु उर्फ शारिक रंगरेज व समिर चा साळा जावेद रंगरेज रा. चाळीसगाव यांना ताब्यात घेऊन वणीत आणले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या तिघांनाही तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आता दुकान पाडल्या प्रकरणी आरोपींची संख्या पाच झाली असून याआधी जेसिबी चालक व वाहकांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

*समीर उर्फ रंगाची रंगदारी*

दुकान तोडल्यानंतर वणीतील व्यापाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. समीर उर्फ रंगा याच्यावर रेती तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहे. यातून कमावलेल्या मायेतून त्याची शहरात चांगलीच रंगदारी सुरू होती. त्याच अहंकारातून त्याने कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवत रात्री दुकान तोडले. शिवाय सकाळी सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन याची लेखी कबुलीही दिली. रंगाच्या या दादागिरी विरोधात व्यापारी वर्ग, राजकीय क्षेत्र यासह विविध स्तरातून दबाव आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here