मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा.
राजु तुरणकर – संपादक वणी– मार्कडेय पोदार लर्न स्कूल, वणी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेचे अध्यक्ष रमेश सुंकुरवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत गायले. मार्च पास्टचे प्रात्यक्षिक आणि स्केटिंग ही लक्षवेधी कामगिरी होती.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात एलकेजीच्या मुलांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने झाली आणि त्यानंतर इयत्ता ४ ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध करणारी नृत्ये, यूकेजीच्या मुलांनी भावपूर्ण देशभक्तीपर गीते, नर्सरीच्या बीरा चावले हिचे भाषण आणि इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी नाट्यछटा सादर केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात रमेश सुंकुरवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी शाळेचे सचिव राहुल सुंकुरवार, सदस्य विश्वस्त प्राची सुंकुरवार आणि मुख्याध्यापक भूषण अलोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
इयत्ता ६ वी मधील सौम्या कश्यप आणि इयत्ता ५ मधील हर्षल पाडवी यांनी सूत्रसंचालन केले तर इयत्ता ४ वीच्या मिहिका मुथा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.