शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख ललित लांजेवार यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन.
लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.
आज दुपारी होणार अंतिम संस्कार
राजु तुरणकर – संपादक.
शिवसेना शिंदे गटाचे वणी शहर प्रमुख ललित लांजेवार वय 45 यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वणीतील एका खाजगी दवाखान्यामध्ये काल सायंकाळी 11 वाजता उपचारादरम्यान निधन झाले.
मागील पाच दिवसांपासून छातीत जळजळ व दुखत असल्याचे घरचे सांगत आहेत, मात्र मागील दोन दिवसांपासून छातीत जास्त त्रास होत असल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार सुद्धा करून घेत असल्याची माहिती असून. डॉक्टरांनी इसिजी नॉर्मल असल्याचे सुद्धा सांगीतले होते. परंतू 29 जानेवारीला रात्री 10 वाजेदरम्यान छातीत जास्त त्रास सुरू झाल्याने सुगम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये भर्ती कऱण्यात आले, उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही व मेजर अटॅक आला व ललित लांजेवार यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
ललित लांजेवार यांच्या मृत्यूची बातमी कळताच पाहण्यासाठी शहारातील चाहत्यांनी गर्दी केली.
ललित यांच्या मागे आई, वडील,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बहिणी जावई असा बराच मोठा आप्त परिवार आहे. राजकीय क्षेत्रात ललित लांजेवार वणी शहरात परिचित असलेले व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अचानक एक्झीटमुळे मित्र परिवाराला, नातेवाईकांना फार मोठा धक्का बसला असून शहरात शोककळा पसरली आहे. आज दुपारी एक वाजता त्यांचे पार्थिवावर वणी येथील मोक्षधम मध्ये अंतिम संस्कार करण्यात येईल.
लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच भावपुर्ण श्रध्दांजली.