खळबळजनक आरोप….वणी पोलीस स्टेशनचा ‘हवालदार बनला रेती माफिया’ बातमी ललित लांजेवार यांच्या मृत्यूला कारणीभूत- ललित लांजेवार यांच्या पत्नीचा दावा..
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सह संजय राठोड कडे पत्नी श्रीरंगी ने केली चौकशीची मागणी.
राजु तुरणकर – संपादक.
शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख ललित लांजेवार यांचा बहुचर्चित हार्ट अटॅक ने झालेला मृत्यू हा संशयास्पद असल्याचा खळबळ जनक आरोप स्वर्गीय ललित लांजेवार यांच्या पत्नी श्रीरंगी ललित लांजेवार यांनी केला आहे. मृत्यूला जबाबदार धरीत पोलीस कर्मचारी विकास धडगे यांच्यावर कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ललीत सुरेशराव लांजेवार, शिवसेना शिंदे गटाचे वणी शहर प्रमुख होते ते नेहमी गोर-गरीब लोकांना मदत करीत असे व सामाजीक लोकांचे काम करीत असे. दिनांक २४/०१/२०२५ शुक्रवार रोजी दैनीक सहासिक पेपरमध्ये एक बातमी प्रकाशित झाली होती. त्या बातमीचे मुख्य शिर्षक ‘ पोलीस स्टेशनचा हवालदार बनला रेती माफिया’ हि बातमी प्रकाशित झाली होती. सदर बातमी ललीत ने वाचल्या नंतर ही बातमी पोलीस मित्र गृप ला प्रसारीत केली. ही बातमी पोलीस हवालदार विकास धडसे यांच्या बद्दल असल्यामुळे त्यांनी ही बातमी का प्रकाशित केली म्हणून ललीत लांजेवार यांना उपविभागीय कार्यालयाजवळ ‘तु माझं काही करु शकत नाही व तुला एखाद्या अॅस्ट्रासिटी अॅक्ट च्या गुन्ह्यात फसविणार’ असे म्हटले. सदर गोष्ट ललीतने विनोद मोहितकर व महेश कुचेवार यांना सांगितली. दि. २६ जानेवारी २०२५ रविवार रोजी मा. नामदार संजय राठोड, पालक मंत्री यवतमाळ जिल्हा यांना ललीत लांजेवार यांनी स्वतःच्या लेटर हेडवर विकास धडसे यांच्या बद्दल तक्रार दिल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
सदर पोलीस हवालदार गुन्हेगारी कृत्याचा असुन तो कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला अॅस्ट्रासिटीच्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिल्याचे ललित लांजेवार यांनी मृत्यू पूर्वी पत्नी श्रीरंगी हिला सांगितल्याचे सुद्धा निवेदनात नोंद आहे.
विकास धडसे’ ह्या पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या धमकीमुळेच माझे पती प्रचंड तनावात होते व त्यांनी विकास धडसे यांच्या धमकीला मनाला खुप काही लावून घेतले होते. म्हणूनचं या तनावामुळे वं धास्ती घेतल्यामुळे माझ्या पतीला हृदय विकाराचा झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार विकास धडसे पोलीस हेच आहे. तरी मला न्याय मिळावा व संबंधीतावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदनातून करण्यात आली आहे.