प्रतिष्ठित कोळसा व्यापारी जाकिर शेख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
राजु तुरणकर – लोकवाणी जागर
वणी चिखलगाव येथील प्रतिष्ठित कोळसा व्यापारी तथा स्पीड ट्रान्सपोर्ट चे मालक जाकीर नईम शेख वय 58 यांचे हार्ट अटॅक आल्यामुळे उपचारा दरम्यान नागपूर येथील किंग्स वे हॉस्पिटल मध्ये काल रात्री निधन झाले.
जाकीर शेख यांचे चिखलगाव येथील लालपुरिया परिसरात कोळसा व ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ते मनमिळावू व सर्वांशी प्रेमाने वागण्याच्या स्वभावामुळे सर्व परिचित व लोकप्रिय होते.ओम नगर चिखलगाव येथील निवास स्थानातून त्यांची अंतिम यात्रा निघणार असून ग्रामीण रुग्णालय वणी जवळील मुस्लिम अक्सा मस्जिद कब्रस्तान मध्ये आज दिनांक 2 फेब्रुवारी 2025 ला दुपारी 2 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार(सुपूर्द ए खाक) करण्यात येईल… लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.