वणी शहारत स्मार्ट ( प्रिपेड) मीटर न बसविण्याची शिवसेनेची ची मागणी.

0
302

वणी शहारत स्मार्ट ( प्रिपेड) मीटर न बसविण्याची शिवसेनेची(ubt) ची मागणी.

रिचार्ज संपल कि विद्युत प्रवाह बंद, जनतेला सावध होण्याची गरज स्मार्ट मीटरचा विरोध करण्याचे शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे गटाच्या वतीने आवाहन.

राजु तुरणकर – संपादक.

राज्यात फॉल्टी मीटरच्या जागी स्मार्ट (प्रीपेड) मीटर बसवण्याचे काम सुरू असून. हे मिटर एखाद्या मोबाईल प्रमाणे कार्य करणार आहे. रिजार्च संपला की मोबाईलची सेवा बंद होईल त्याच प्रमाणे विद्युत खंडीत होइल व याचा ग्राहकांना मनस्पात होईल. तसेच काही खासगी कंपन्यांना याचा फायदा होईल. त्यामुळे स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याचे धोरण रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रवि बोढेकर यांनी निवेदन देऊन विद्युत् वितरण अभियंता यांना केली आहे.

शासन निर्णयानुसार स्मार्ट मीटर्स, ट्रान्सफॉर्मर मीटर्स, फीडर मीटर्स व संबंधित सुविधा यासाठी एकूण ३९ हजार ६०२ कोटी रुपये खर्चाच्या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. यात ६० टक्के अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.तर उर्वरित ४० टक्के रक्कम ही महावितरण कंपनीने कर्जाद्वारे उभी करावयाची आहे. ही रक्कम त्यावरील व्याजासह कंपनी भरणार आहे. त्यासाठी कंपनी आपल्या पुढील २०२४ अखेरीस दाखल करणार असलेल्या दरवाढ प्रस्तावामध्ये ही रक्कम मागणी करणार हे वास्तव आहे. आधीच विज भाववाढीने त्रस्त जनतेला कराच्या रूपाने विज दरवाढीचा अतिरिक्त ओझा टाकण्यात येईल. सोबतच महावितरणच्या अकाऊंट व बिलिंग विभागातील मीटर रिडींग, विज बिल करणारे, बिल वाटप करणारे, खंडित वीज पुरवठा सुरू करणारे, मिटर टेस्टिंग या सारख्या अनेक विभागांत कंत्राटी पद्धतीने काम करणारे हजारो कर्मचारी बेरोजगार होतील. त्यामुळें वणी विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही जनतेच्या घरी हे मीटर लावू नये लावल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रवी बोढेकर शिवसेना तालुकाप्रमुख वणी यांनी दिला आहे.

यावेळी शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास, माजी तालुका प्रमुख गणपत लेडांगे, माजी नगरसेवक राजू तुरणकर, आयुष ठाकरे युवासेना विधानसभा समन्वयक व शिवसैनिक उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here