संजय खाडे यांना पितृ शोक, रामचंद्र खाडे यांचे निधन.
राजू तूरणकर
वणी येथील रंगनाथ स्वामी अर्बन निधी लि. चे अध्यक्ष व वसंत जिनिंगचे संचालक संजय रामचंद्र खाडे, यांचे वडील रामचंद्र तुकाराम खाडे(84) यांचे अल्पश्या आजाराने आज दि.19/10/ 2023 ला दुपारी 12 वाजता नागपूर येथे निधन झाले आहे.
रामचंद्र खाडे यांची काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले होते. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. ते रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड चे अध्यक्ष श्री संजय खाडे यांचे वडील होते.
त्यांचेवर आज सायंकाळी 5 वाजता वणी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली जावई नातवंडे असा आप्त परिवार आहे.