आज आ. संजय देरकर करणार राजूर – भांदेवाडा भूमिगत कोळसा खाणीची पाहणी.

0
316

आज आ. संजय देरकर करणार राजूर – भांदेवाडा भूमिगत कोळसा खाणीची पाहणी

भूमिगत कोळसा खाणीत जावून पाहणी करणारे संजय देरकर हे वणी विधानसभा क्षेत्राचे ठरणार पहिले आमदार.

राजु तुरणकर वणी:- वेस्टर्न कोल्ड फील्ड लिमिटेड नॉर्थ क्षेत्रातील राजूर – भांदेवाडा भूमिगत कोळसा खाणीची आज दिनांक ८ रोजी सकाळी ११ वाजता वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर हे पाहणी करणार असून प्रत्यक्ष भूमिगत खाणीत जावून पाहणी करून कामगारांच्या समस्या जाणून घेणारे संजय देरकर पाहिले आमदार ठरणार आहे.

वणी नॉर्थ क्षेत्रात भांदेवाडा व कुंभारखणी या दोन भूमिगत कोळसा खाणी असून यातील भांदेवाडा या खाणीत सुमारे ७५० च्या वर कामगार काम करीत आहे. यात यवतमाळ, चंद्रपूर , नागपूर जिल्ह्यातील कामगारांचा समावेश आहे. कोळशाच्या खुल्या खदाणीत कामगार म्हणून काम करण्यासाठी अनेक जण उत्साहाने काम करतात परंतु भूमिगत खाणीत काम करण्यासाठी सहजा सहजी कोणी धजवत नाही.

भुमिखत कोळसा खाणीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते असून अनेक किलोमीटर आत जावून कोळशाचे उत्खन करावे लागते आहे. कोळसा उत्खनन करताना लहणातील लहान चूक देखील जीवावर बेतू शकतात असे कामगारांकडून सांगण्यात येतात. म्हणून या ठिकाणी जिम्मेदारी घेवून कामगारांना कोळसा उत्खनन करावे लागते आहे.

भूमिगत कोळसा उत्खनन करण्यासाठी वेकोली कामगारांना काय अडचणी निर्माण होतात व त्यांच्या पुढे कोणकोणती आवाहने निर्माण होतात याची प्रत्यक्ष जाणीव व पाहणी करण्यासाठी आमदार संजय देरकर हे स्वतः भूमिगत कोळसा खाणीत जावून पाहणी करणार आहे. भूमिगत कोळसा खान प्रत्यक्ष पाहणारे देरकर हे पहिले आमदार ठरणार आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होत आहे. एक आमदार प्रथमतः कोळसा खाणीत जाणार असल्याने वेकोळी कडून चोख सुरक्षा घेण्यात येत आहे.

त्यांचे सोबत वेकोलीचे महाप्रबंधक रेड्डी, शिवसेचे उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, रवि बोढेकर तालुका प्रमूख, राजु तुरणकर, अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख,दिलीप भोयर, अजय कवरासे, मो. अस्लम, संघदीप भगत, मो. अशरफ, भगवान मोहिते, संजय देठे, प्रेमा धानोरकर व शिवसेनेचे काही नेते मंडळी उपस्थित असणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here