महावितरण उठले शेतकऱ्यांच्या जीवावर.

0
165

महावितरणचा तुघलकी कारभार, उठतोय शेतकऱ्यांच्या जीवावर.

पाऊस गायब, पीक हातात येण्याच्या उंबरठ्यावर, महावितरणचा लपंडाव. सोसियल मीडियावर काल रंगली चर्चा.

आनंद नक्षणे —मारेगाव

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. पाऊस गायब झाला आहे, विहिरी तलावात पाणी आहे, पीक शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर उभे आहे, मात्र महावितरणच्या लपंडाव धोरणामुळे शेतकऱ्यातून कमालीचा संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात विजेची वाट पाहण्यातच शेतकऱ्यांचा दिवस निघून जातो, अशी स्थिती आहे.

मागील काही दिवसात तालुक्यात वीज वितरण कंपनीचा कारभार मोठ्या प्रमाणात ढेपाळला आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य त्रस्त आहेत.आज मारेगाव उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्याकरिता काँग्रेस कमिटी चे कार्यकर्ते निवेदन देण्यात आले.काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मा.मारोती गोहोकर तसेच मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा शहर अध्यक्ष आकाश बदकी शारुख शेख, समीर कुडमेथे, रॉयल सय्यद आकाश भेले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मधे आज दि.१९/१०/२०२३ रोजी मारेगाव उप कार्यकारी अभियंता महावितरण उपविभागीय कार्यालय मारेगांव येथे सतत लाईन चा लपंडाव सुरु असल्याने निवेदन देण्यात आले खरे, पण या निवेदनाचा महावितरण कंपनीवर असर पडेल काय हे वेळच सांगेल.

काल मारेगाव शहर व परिसरात दिवसभर लाईन नसल्याने सोसियल मीडियावर जागृत पत्रकार आनंद नक्षणे यांनी चार ओळी लिहल्याने चांगलीच चर्चा रंगली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here