मारेगाव तालुका अध्यक्ष पदी अमोल कुमरे यांची निवड.
राजु तुरणकर – लोकवाणी जागर मारेगाव : मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या मारेगाव तालुका अध्यक्षपदी अमोल कुमरे यांची निवड करण्यात आली आहे. सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे विरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने वरीष्ठ पातळीवरुन न्याय मिळवून देणारी चळवळ उभी करण्यात आली आहे. या चळवळीची शाखा तालुका पातळीवरुन कार्यान्वीत करण्यासाठी मारेगाव तालुका मानवी हक्क सुरक्षा परिषदेची कार्यकारणी गठीत करण्यात आली असुन मारेगाव तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अमोल कुमरे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी निवडीचे पत्र नवनिर्वाचीत अध्यक्ष अमोल कुमरे यांचेकडे सुपूर्द करुन पुढील शाखा विस्तारीत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सामान्य माणसाचे मानवी हक्क आणि त्याची सुरक्षा कायमस्वरुपी अबाधीत राहावी यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहाणार आहे. तालुक्यात अशा घटना घडल्यास तत्परतेने सुरक्षा मिळवुन देऊ – अमोल राधा सूर्यभान कुमरे
मानवी हक्क सुरक्षा परिषद अध्यक्ष मारेगाव तालुका.