चीडीमारी व दादागिरीचा कहर, गुन्हा दाखल.

0
576

चिडीमारी व दादागिरीचा कहर, अल्पवयीन मुलीचा घरासमोर अश्लील भाषेत शिवीगाळ करणे व जावून जोरजोरात ओरडणे पडले महागात.

तीन युवकावर गंभीर गुन्हे दाखल, पोलिसांनी आरोपीला तात्काळ केली अटक, असली दादागिरी ठेचून काढणार पोलीस प्रशासन.

राजू तूरणकर—वणी

सध्या शहरात दादागिरी, चिडी मारी व टोळक्याने मिळून मारामारी ह्या घटना नित्याच्या झाल्या आहेत.काल शहरालगत असलेल्या गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका  तरुणासह त्याच्या दोन कार्टून साथी दारांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या रंगेल तरुणांन विरोधात आज तिने दिलेल्या तक्रारी वरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्याच्यासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. आरोपी हा अल्पवयीन मुलीची कधी भर रस्त्यात तर कधी तिच्या घरसमोर जोरजोरात ओरडून छेड काढीत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. तिचं जोरजोराने नाव घेऊन व अश्लील शब्द प्रयोग करून आरोपी हा तिला लज्जा येईल असे कृत्य करीत होता.

अल्पवयीन मुलीला रस्त्यात गाठून तिचे नाव घेऊन अश्लील शेरेबाजी करीत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देणाऱ्या सोहेल अफसर शेख (२०) याच्यासह तेजस भगत व स्वप्नील चिंचोलकर या तीनही आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
कोळसा व्यवसायिक सोहेल अफसर शेख या तरुणाने शहरालगत वास्तव्यास असलेल्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला प्रलोभनं व आमिषे दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. ती त्याच्या भूलथापांना बळी पडून त्याच्या प्रेमात पडली. परंतु नंतर तिला त्याचे इतरही मुलींशी प्रेमसंबंध असल्याचे कळाले. त्यामुळे ती त्याच्यापासून दूर झाली. परंतु सोहेल शेख हा तिच्यावर जबरन प्रेम लादण्याचा प्रयत्न करू लागला. तिला आपली टपोरीगिरी दाखवू लागला. तिच्या घरासमोर उभे राहून जोरजोरात ओरडणं, तिचं नाव घेऊन अश्लील शेरेबाजी करणं, ती घराबाहेर येताच तिची छेड काढणं, या त्याच्या टपोरीगिरीमुळे ती कमालीची धास्तावली होती. मुलीच्या आईने व बहिणीने अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो कुणालाच जुमानत नव्हता. तो तिचा नेहमी पाठलाग करून तिचे नाव घेऊन अश्लील शब्द प्रयोग करीत असल्याने बदनामीच्या भीतीने तिने महाविद्यालयात जाणे बंद केले. कधी दुचाकीने तर कधी चार चाकीने आपल्या मित्रांना सोबत घेऊन तो तिचा पाठलाग करून तिला नाहक त्रास द्यायचा. १८ ऑक्टोबरला सोहेल अफसर शेख, तेजस भगत व स्वप्नील चिंचोलकर हे तिघेही रात्री ११ वाजता मुलीच्या घरासमोर उभे राहून जोरजोरात तिचं नाव घेऊन आवाज देत होते. सोहेल शेख हा मुलीचं नाव घेऊन तिला शिवीगाळ करीत असतांना मुलीची आई व बहीण घराबाहेर आली, व त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न पण तो अरेरावीची भाषा करून त्यांनाच धमकावू लागला. तुम्ही जर पोलिसांत तक्रार केली तर तुमचं जगणं कठीण करेन असा दम त्याने मुलीच्या कुटुंबियांना दिला. त्यामुळे त्याच्यापासून धोका उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता मुलीने हिंमत करून सोहेल अफसर शेख व त्याच्या मित्रांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. मुलीच्या तक्रारी वरून पोलिसांनी सोहेल अफसर शेख, तेजस भगत व स्वप्नील चिंचोलकर या तिघांनाही अटक करून त्यांच्यावर भादंविच्या कलम ३५४-D, ५०४, ५०६ व सहकलम ११(चार), १२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here