वणीत नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध.
महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त जोरदार घोषणाबाजी करून व्यक्त केला संताप.
राजु तुरणकर – संपादक लोकवाणी जागर
वायफळ बडबड करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर सर्वत्र टीकेचे पडसाद उमटत आहेत. आज वणी शहरातही याचे पडसाद उमटले. संतप्त महिला शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गोऱ्हे यांच्या पोस्टरला पायाखाली चिरडून “ नीलम गोऱ्हे हाय हाय,” “ निषेध असो निषेधअसो” मुर्दाबाद मुर्दाबाद ” अशी जोरदार घोषणाबाजी करत नीलम गोऱ्हे यांचा निषेध केला. महिला पदाधिकारी व शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.
यावेळी शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका डिमन टोंगे , किरण ताई देरकर, पुष्पा भोगेकर, सुरेखा ढेंगळे, किर्तीताई देशकर, सविता आवारी, पुष्पाताई कुळसंगे, माधुरी सुंकुरवार, सौ मोहिते, संध्या दीपक कोकास,माला बदकी, वर्षा कींगरे, तारा बुट्टे, भाग्यश्री सातपुते, वंदना अवतडे, प्रभा ताई आसेकार, चंदा मुन, मते ताई, दीपक भाऊ कोकास माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख, रवि बोढेकर तालुका प्रमुख, अजिंक्य शेंडे युवा सेना उपजिल्हा प्रमुख, सुधीर थेरे शहर प्रमुख, अजय चन्ने, पुरुषोत्तम बुटे , नितीन शिरभाते, गुलाब आवारी, दिवाकर सातपुते,विनोद ढूमने सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.